घरमुंबईआता घ्या, विद्युत निरीक्षक कार्यालयाचीच लिफ्ट बंद!

आता घ्या, विद्युत निरीक्षक कार्यालयाचीच लिफ्ट बंद!

Subscribe

इमारतींना लिफ्टसाठी परवाना देणाऱ्या मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालयाचीच लिफ्ट एक आठवड्यापासून बंद आहे. या कार्यालयातील कर्मचारी आणि कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

राज्यातील टोलेजंग इमारतींना लिफ्टसाठी परवाना देणाऱ्या मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालयाचीच लिफ्ट एक आठवड्यापासून बंद आहे. चार मजले चढून जाण्याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांकडे सध्या पर्याय नाही. चेंबुरच्या या इमारतीत एकुण १४ कार्यालये आहेत. तसेच शेकडो कर्मचारी या इमारतीत काम करतात. पण विभागाच्या इमारतीची लिफ्ट बंद पडल्याने विद्युत निरीक्षक कार्यालयाचीच नाचक्की झालेली आहे.

कर्मचारी आणि नागरिकांची गैरसोय

सेवानिवृत्ती नजीक आलेले अनेक कर्मचारी आणि अधिकारी याठिकाणी कार्यरत आहेत. लिफ्ट बंद पडल्याने कर्मचारी तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. सरकारी वेगाने लिफ्टची दुरूस्त होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.

- Advertisement -

या इमारतीमध्ये ही कार्यालये आहेत

या इमारतीमध्ये एकूण १० कार्यालये आहेत. सार्वजनिक बांधकाम सेवा केंद्र, शिधावाटप कार्यालय, उद्वाहन निरीक्षक, अधिक्षक अभियंता मुंबई बांधकाम मंडळ, अल्पबचत संचालनालय, मार्ग विकास, मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय व विकास महामंडळ, पोलिस उपआयुक्त परिमंडळ ही कार्यालये या इमारतीमध्ये आहेत.

३८ लिफ्ट अपघातात १७ जणांचा मृत्यू

गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत राज्यात एकुण ३८ अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, नवी मुंबई याठिकाणी लिफ्ट अपघाताच्या घटना घडल्या आहेत. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने, लिफ्टची वायर तुटल्याने लिफ्टचा अपघात अशा घटनांचा यामध्ये समावेश आहे. ३८ अपघातांच्या घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -