संभाजीराजे शिवबंधन बांधणार का?; उद्धव ठाकरेंनी धाडला निरोप

Discussion for Rajya Sabha on the name of Sanjay Pawar, a Shivsainik from Sambhaji Raje's Sansthan for the sixth seat
Discussion for Rajya Sabha on the name of Sanjay Pawar, a Shivsainik from Sambhaji Raje's Sansthan for the sixth seat

राज्यसभा निडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेची सहावी जागा प्रतिष्ठेची आणि महत्वाची झाली आहे. या जागेसाठी संभाजीराजेंनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीराजेंची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर तासभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी छत्रपती संभाजीराजेंना उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यासाठी या, असा निरोप संजय राऊत यांच्याकरवी दिला आहे. खासदारकी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट ठेवण्यात आली आहे.

संभाजीराजेंच्या भेटीला शिवसेनेचे शिष्टमंडळ –

आज दुपारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने संभाजीराजेंची भेट घेतली. ही भेट हॉटेल ट्रायडंट येथे झाली. यावेळी शिष्टमंडळात खासदार अनिल देसाई, उदय सामंत, मिलिंद नार्वेकर हे होते. राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ संभाजीराजेंना भेटले होते. या भेटीनंतर काहीवेळात उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या असा निरोप पाठवला आहे. याबाबत संजय राऊत यांनी फोन केल्याची माहिती मिळत आहे.

या पूर्वीची उद्धव ठाकरे आणि संभाजीराजेंची चर्चा –

यापूर्वीही संभाजीराजे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जी चर्चा झाली होती. तेव्हाही हा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवण्यात आला होता. मात्र, त्यावेळी संभाजीराजेंनी मला शिवसेना पुरस्कृत उमेदवार नाही तर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार घोषित करा, असे आवाहन केले होते. त्यानंतर संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार घोषित करा, अशी भूमिका घेतली. पण, संभाजीराजेंनी शिवसेना पक्षप्रवेश करावा, हाती शिवबंधन बांधावे, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांकरवी संभाजीराजेंना दिला आहे.

उपक्ष उमेदवारी –

संभाजीराजेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यसभेसाठी स्व:ताची अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आपल्याला पाठींबा देण्याचे आवाहन केले होते. सोबत त्यांनी स्वराज्य या राजकीय संघटनेची स्थापना केली होती. यासाठी त्यांनी राज्याचा दौैरा करण्याची घोषणा केली होती.