घरCORONA UPDATEभयानक! सायन हॉस्पिटलमध्ये पेशंटशेजारी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह!

भयानक! सायन हॉस्पिटलमध्ये पेशंटशेजारी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह!

Subscribe

सायन रुग्णालयातला एक व्हिडिओ भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केल्यानंतर त्यावरून मोठी खळबळ उडाली होती. सायन रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाशेजारीच इतर रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव या व्हिडिओमधून समोर आलं होतं. या व्हिडिओमुळे मुंबईत खळबळ माजली असून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ‘हा रुग्णालयाचा हलगर्जी कारभार असून जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे’, अशी मागणी मुंबई महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. ‘अशी परिस्थिती रुग्णालयात असेल, तर सामान्य रुग्ण आता कशाला सायन रुग्णालयात जातील?’ असा सवाल देखील राजा यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर आता सायन रुग्णालय प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते, ते पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने सायन रुग्णालयाला भेट दिली. या प्रकरणाची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची एक समिती देखील नेमण्यात आली आहे. ‘नातेवाईक कधी १० मिनिटांत येतात, १५ मिनिटांत येतात. त्यामुळे तिथूनच थेट मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली. मृतदेह पूर्णपणे कव्हर करूनच तिथे ठेवला होता. त्यामुळे नातेवाईकांनी देखील मृतदेह घेण्यासाठी लवकर यायला हवं’, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेले रुग्ण उघड्यावर |Covid 19 dead body kept in general ward | Sion Hospital

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेले रुग्ण उघड्यावर |Covid 19 dead body kept in general ward | Sion Hospital

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮೇ 6, 2020

आमदार नितेश राणेंनी हे ट्वीट बुधवारी रात्री केल्यानंतर त्यावरून मोठी खळबळ माजली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना, ‘हा व्हिडिओ सायन रुग्णालयातलाच आहे हे मान्य आहे, मात्र तो कधीचा आहे, हे आत्ताच सांगता येणार नाही’, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे डीन प्रमोद इंगळे यांनी दिली आहे. ‘सायन रुग्णालयाच्या शवागारामध्ये रुग्ण ठेवण्यासाठी जागा कमी असून त्यावर मर्यादा आहेत. मात्र, मृतदेह लवकरच इतर ठिकाणी हलवण्याची कार्यवाही केली जाईल’, असं देखील त्यांनी सांगितलं. दरम्यान, ‘कोरोनाच्या भितीमुळे काही रुग्णांचे नातेवाईक मृतदेह नेण्यासाठी टाळाटाळा करत असल्याची’ बाजू इंगळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडल्यानंतर नितेश राणे यांनी ट्वीटवर गंभीर आक्षेप घेणारं ट्वीट केलं आहे.

- Advertisement -

‘काल रात्रीपासून सायन हॉस्पिटल म्हणत होते की हा व्हिडिओ खोटा आहे. आता त्यांनी भलतंच उत्तर दिलं आहे. आता पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. आता त्यांनी हे मान्य केलं आहे की व्हिडिओ सायन रुग्णालयातलाच आहे. पण नातेवाईक मृतदेह नेत नाहीत म्हणून तो तिथेच आहे. या उत्तरानंतर आपण मुंबई महापालिकेकडून कोणत्या उत्तराची अपेक्षा ठेऊ शकतो? खासगी रुग्णालय कोरोनाच्या रुग्णांना स्वीकारत नाहीत आणि सरकारी रुग्णालयांची अवस्था झाली आहे’, असं ट्वीट राणेंनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -