घरमुंबईआता कोणत्याही लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना लस मिळणार

आता कोणत्याही लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना लस मिळणार

Subscribe

लसीकरण वाढविण्यासाठी पालिका आरोग्य विभागाचा प्रयत्न

कोरोनाविरोधातील राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला ‘कोविन ऍप’ मधील त्रुटींमुळे आणि लसीकरणाकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवल्याने अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे आता पालिका आरोग्य विभागाने तातडीने या ऍपमधील त्रुटी दूर करून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलेल्या लाभार्थ्यांना कोणत्याही केंद्रांवर लसीकरण करण्यास मुभा दिली आहे.
त्यामुळे लसीकरणाचा आकडा वाढण्यास मदत होणार आहे. तेवढेच पालिका आरोग्य विभागाला समाधान मिळणार आहे.

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ४० बुथवर दिवसाला ४ हजार लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र त्या दिवशी फक्त १९२६ लोकांनीच लस घेतली होती. त्यानंतर कोविन ऍपमधी त्रुटींमुळे दोन दिवस लसीकरण थांबविण्यात आले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी १९ जानेवारी रोजी पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र त्या दिवशी ३,२०० लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असताना फक्त १५९७ लोकांनीच लसीकरणाचा लाभ घेतला. त्यामुळे लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत असल्याने पालिका आरोग्य विभाग बेचैन झाले आहे. कोविड लसीकरणाचा एवढा गाजावाजा झाल्यानंतरही त्यास कमी प्रतिसाद मिळत असल्याने आरोग्य विभागाने त्यावर नामी शक्कल लढवली आहे. कोविन ऍपवर नोंद असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळील कोणत्याही केंद्रावर लसीकरण करून घेण्याची सूट देण्यात आली आहे. यामुळे लसीकरणाची संख्या वाढेल अशी अपेक्षा पालिका प्रशासनाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -