घरताज्या घडामोडी'करोनाग्रस्तांची नावे जाहीर करा, ते गुन्हेगार नाहीत'

‘करोनाग्रस्तांची नावे जाहीर करा, ते गुन्हेगार नाहीत’

Subscribe

'करोनाग्रस्तांची नावे जाहीर करा, ते गुन्हेगार नाहीत', अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

देशात करोनाबाधितांचा आकडा १४७ वर पोहोचला आहे असून महाराष्ट्रात सर्वात जास्त ४२ रुग्ण आहेत. एकीकडे राज्य सरकारने करोनाची लागण झालेल्यांची नावे जाहीर करु नका, असे आवाहन केले असताना आता मनसेकडून नाव जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. तसेच यामुळे जनजागृती वाढेल असा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

नावे जाहीर केल्यास जनजागृती होईल

‘करोनाची लागण झालेले रुग्ण गुन्हेगार किंवा आरोपी नाही आहेत. त्यांना एचआयव्हीसारख्या रोगाचीही लागण झालेली नाही. त्यामुळे त्यांची नावे जाहीर केल्यास त्यातून जनजागृतीच वाढेल. जी लोक करोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आली आहेत त्यांनाही माहिती मिळेल आणि जागरुक होतील. त्याचप्रमाणे करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे अतिशय गरजेचे आहे’, असे स्पष्टीकरण मनसे नेते ,संदीप देशपांडे यांनी दिले आहे.

- Advertisement -

दरम्यान, काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झालेल्या एका कुटुंबाच्या मुलांना शाळा आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यास नकार दिला होता. तसेच एका व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. त्या व्यक्तीच्या कुटुंबावर गावाने बहिष्कार टाकल्याची घटना घडली होती. त्यांच्यातील पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांनी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे तक्रार केली होती. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत करोनाची लागण झालेल्यांची नावे जाहीर न करण्याचे आवाहन करताना, नावे जाहीर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता.

मात्र, संदीप देशपांडे यांनी मात्र, नावे जाहीर केल्यानंतर कोणीही त्यांना वालीत टाकणार नाही, आपला समाज यातून सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona : पुण्यात करोनाचे १८ रुग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -