घरताज्या घडामोडीCoronvirus : कोरोनाबाधितांना परवानगीशिवाय खासगी रुग्णालयात नो एंट्री , BMC चा मोठा...

Coronvirus : कोरोनाबाधितांना परवानगीशिवाय खासगी रुग्णालयात नो एंट्री , BMC चा मोठा निर्णय

Subscribe

मुंबईतल्या खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी कोविड रुग्णांना मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. अशा सूचना मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पुन्हा एकदा निर्बंध जारी करण्यात येत आहेत.

गेले अनेक वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे.आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे थैमान देशभरात सुरु आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेप्रमाणे जे नियम करण्यात आले ते करण्यात येणार आहेत. मुंबईतल्या खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी कोविड रुग्णांना मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. अशा सूचना मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पुन्हा एकदा निर्बंध जारी करण्यात येत आहेत. बेडची कमतरता याशिवाय रुग्णांची गैरसोय होणार नाही, याकरीता मुंबई महानगरपालिकेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक रुग्णालयांना 80 टक्के  बेडची उपलब्धता करण्यास सांगितले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. याशिवाय सरकारने निर्देशित केलेले दर आकारणे प्रत्येक खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.

परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांना दाखल करु नये, अशा सक्त सूचना मुंबई महानगरपालिकेने दिल्या आहेत.तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय आयसीयू वॉर्डस,बेड्स अशा अनेक सूचना महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.

- Advertisement -

कडक निर्बंधांसह लॉकडाऊनवर चर्चा

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांची माहिती शरद पवार यांनी घेतली आहे. कडक निर्बंध आणि लॉकडाऊनबाबतच्या गोष्टींवरही शरद पवारंनी चर्चा केली आहे. मुंबईतील ट्रेन बंद कऱण्याबाबत तुर्तास निर्णय झाला नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शरद पवार यांनी कोरोना परिस्थितीची माहिती घेतली असून ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री निर्बंधांबाबत निर्णय घेतील असे राजेश टोपे म्हणाले आहेत.


हेही वाचा – मोदींचा ताफा अडला तिथून पाकची बॉर्डर अत्यंत जवळ, पीएमच्या सुरक्षेशी खेळ, फडणवीसांचं टीकास्त्र

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -