घरमुंबईनगरसेवकांना निधी लॅप्स होण्याची चिंता, हवीय मुदतवाढ

नगरसेवकांना निधी लॅप्स होण्याची चिंता, हवीय मुदतवाढ

Subscribe

मार्च महिन्याअखेरपर्यंत न केल्यास हा कोट्यवधी रुपयांचा निधी लॅप्स होण्याची दाट भीती या नगरसेवकांना वाटत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी, सदर शिल्लक निधीचा वापर करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत कमी वाटत असल्याने ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली.

मुंबईत गेल्या मार्च महिन्यापासून तळ ठोकलेल्या कोरोनामुळे नगरसेवकांची विकासकामे रखडल्याने आणि त्यासाठी खर्च होणारा निधीही शिल्लक राहिल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र चिंता व्यक्त केली. या निधीचा वापर आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच मार्च महिन्याअखेरपर्यंत न केल्यास हा कोट्यवधी रुपयांचा निधी लॅप्स होण्याची दाट भीती या नगरसेवकांना वाटत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी, सदर शिल्लक निधीचा वापर करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत कमी वाटत असल्याने ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी, नगरसेवकांना निधी वापराबाबत मुदतवाढ देण्याबाबतच्या विषयाला वाचा फोडली. त्यास सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी पाठींबा दिला. सॅप प्रणालीत वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे नगरसेवकांच्या मंजूर विकासकामांचे कार्यादेश मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे कामे होणार नाहीत.

कोरोनामुळे गेले वर्षभर मुंबईत असल्याने विकासकामेही होऊ शकलेली नाहीत. कोट्यवधी रुपयांचा निधी वापराशिवाय लॅप्स होईल, अशी भीती व्यक्त करीत संध्या दोशी यांनी आयुक्तांनी किमान तीन महिने निधी वापरासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावर सभागृह नेत्या विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट आदींनी नगरसेवकांना कोरोनामुळे विकासकामे करायला न मिळाल्याने निधी लॅप्स होणार असल्याने हा निधी वापरण्यासाठी किमान तीन महिने मुदतवाढ द्यावी. विकासकामांसाठी कार्यादेश देण्यासाठी पालिकेने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी आणि सदर कामे अंमलात येण्यासाठी ३० जूनपर्यत मुदतवाढ द्यावी,अशी मागणी करण्यात आली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी, नगरसेवकांच्या भावना आयुक्त यांना कळविण्यात येईल व त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल,असे आश्वासन दिले.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेशी पंगा भाजपला पडला महागात; भाजपच्या निधीत मोठी कपात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -