घरमुंबईक्रॉफर्ड मार्केट पुनर्विकास; गाळेधारकांच्या समस्या मार्गी लावण्याची महापौरांनी दिली हमी

क्रॉफर्ड मार्केट पुनर्विकास; गाळेधारकांच्या समस्या मार्गी लावण्याची महापौरांनी दिली हमी

Subscribe

क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास करताना गाळेधारकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घेण्यात यावी, असे आदेश महापौरांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई महापालिकेतर्फे प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. मात्र, या मार्केटमधील गाळेधारकांना सेवासुविधा व जागेसंदर्भात काही समस्या होत्या. या समस्या मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाला जवळजवळ ७-८ वर्षे लागली. आता दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्केटमध्ये सध्या गाळेधारक हे कसेही, कुठेही बसत आहेत. मार्केटमध्ये सेवासुविधांचा अभाव आहे. व्यवस्थापन नीटपणे होत नाही. त्यामुळे या हेरिटेज मार्केटच्या पुनर्विकासाचे काम पालिकेने हाती घेतले. या मार्केटमध्ये गाळेधारकांना पुरेशी जागा देण्यात येणार आहे. तसेच, गाळेधारक आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, नीटनेटकेपणा आदी बाबींवर भर देण्यात येणार आहे.

पुनर्विकास कामाच्या पहिल्या टप्प्यालाच जवळपास ७-८ वर्षे गेली. त्यामुळे आताच दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, या मार्केटच्या पुनर्विकासाबाबत येथील गाळेधारक अंधारात असून त्यांना काम चालू असताना नेमके कुठे, कसे स्थलांतरित केले जाणार, पुनर्विकास करताना गाळेधारकांना किती व कशी जागा दिली जाणार याबाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळे गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने महापौर किशोरी पेडणेकर यांची मध्यंतरी भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या.

- Advertisement -

महापौरांनी गाळेधारकांच्या समस्यांची गंभीर दखल घेत बुधवारी दुपारी क्रॉफर्ड मार्केट येथे भेट देऊन पुनर्विकास कामाची पाहणी केली व कामांबाबत आढावा घेतला. याप्रसंगी सहआयुक्त (सुधार) रमेश पवार, तसेच सहाय्यक आयुक्त (बाजार) मृदुला अंडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास करताना येथील गाळेधारकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याबाबत काळजी घेण्यात यावी. त्यासोबतच प्रत्येक परवानाधारकांना त्यांची किती जागा आहे, पुनर्विकासाचे काम कधी पूर्ण होणार, त्यांना किती जागा मिळेल याची सविस्तर  माहिती असलेले अधिकृत पत्र देण्यात यावे, असे आदेश महापौरांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. महापौरांनी यावेळी गाळेधारकांना देण्यात येणाऱ्या संक्रमण शिबिराच्या जागेचीसुद्धा पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -