घरमहाराष्ट्रनागपूरBhavana Gawali : मोदी येणार, त्यात मला इंटरेस्ट...; यवतमाळ दौऱ्यानिमित्त भावना गवळींचं वक्तव्य

Bhavana Gawali : मोदी येणार, त्यात मला इंटरेस्ट…; यवतमाळ दौऱ्यानिमित्त भावना गवळींचं वक्तव्य

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित महिलांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे.

यवतमाळ : शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांचा मतदारसंघ असलेल्या वाशिम-यवतमाळ दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज असून, मोदींच्या दौऱ्याआधी भावना गवळी यांनी एक सूचक विधान केलं आहे. जेव्हा-जेव्हा मोदी येतात तेव्हा शूभ संकेतच मिळतात. तर जाहिरातीमधील फोटोमध्ये मला इंटरेस्ट नसून, मोदी येताहेत त्यात मला इंटरेस्ट असल्याच्या त्या म्हणाल्या. (Bhavana Gawali Modi will come I am interested in that Bhavana Gawlis speech on the occasion of Yavatmal tour)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित महिलांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. यानिमित्ताने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत स्थानिक खासदार भावना गवळी यांचा फोटो वगळण्यात आला आहे. याबाबत भावना गवळी यांना विचारण्यात आले असता त्यांनी जाहिरातमधील फोटोमध्ये मला इंटरेस्ट नसून, मोदी येताहेत त्यात मला इंटरेस्ट असल्याचे म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा : Himachal Political: हुश्श… हिमाचलमधील काँग्रेसचं सरकार अबाधित; बहुमताने मांडला अर्थसंकल्प

उमेदवारीबाबत काय म्हणाल्या गवळी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर असून, यानिमित्त प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी महायुतीतून दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी तर सुरू नाही ना? अशा उलटसुलट चर्चांना उधाण आले असतानाच भावना गवळी यांनी याबाबत परखड भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, 2014, 2019 साली मोदी यवतमाळमध्ये आले होते, आणि 2024 मोदी येत आहेत. ते ज्या ज्या वेळेला येथे आले तेव्हा शुभ संकेतच मिळाले आहेत. हा महिलांचा मेळावा आहे, या मेळाव्यासाठी मोदी येत आहेत. ते महिलांना संबोधित करणार आहे. हा महिलांसाठी महत्त्वाचा मेळावा आहे. तसेच, यवतमाळच्या रेल्वेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दौरा आहे. यासोबतच माझ्या उमेदवारीला प्रत्येकवेळी विरोध होतो. पण प्रत्येकवेळेला मी माझाच रेकॉर्ड तोडलेला आहे. त्यामुळे त्या फोटोत मला इंटरेस्ट नाही. मोदी येणार आहेत, त्यात मला इंटरेस्ट आहे. लाखो महिलांसमोर मोदी बोलणार आहेत असे गवळी म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Budget Session : अटल सेतूवरून विधानसभेत देशमुख-शेलारांमध्ये श्रेयवादाची लढाई

म्हणून दिला होता इशारा

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत बोलताना खासदार भावना गवळी म्हणाल्या की, आम्ही 13 खासदार मुख्यमंत्री शिंदेंबरोबर गेलो होतो. तेव्हा आम्हाला आश्वासित केलं होतं की, यापुढेही तुम्हाला कायम ठेवणार. त्यामुळे माझी उमेदवारी कोणाला देण्याचा प्रश्नच येत नाही. या उमेदवारीवर माझाच दावा आहे, मी सलग पाचवेळा निवडून आले आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला आहे की जी सातत्याने निवडून येते. म्हणून मी म्हणते की मै अपनी झांशी नहीं दुंगी असेही त्या यावेळी म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -