घरमुंबईलोकसभा निवडणुकीत ड्रोनला मागणी

लोकसभा निवडणुकीत ड्रोनला मागणी

Subscribe

मुंबईत बंदी असल्यामुळे पुरवठा रखडला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून मुबंईसह राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये ड्रोन कॅमेरांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मात्र पोलीस परवानगी शिवाय कंपन्यांकडून ड्रोन कॅमेराची मागणी पूर्ण करता येत नसल्यामुळे उमेदवाराकडून विना परवाना ड्रोन कॅमेरांचा वापर करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. मुंबईत २१ मार्च ते २९ मार्च पर्यंत ड्रोनवर बंदी असून यासाठी पोलिसांकडे अद्याप कुठलाही प्रकारच्या परवानगीसाठी अर्ज आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. विनापरवाना ड्रोनचा वापर झाल्यास कारवाई कऱण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून राज्यभरात प्रचाराचा धडाका सुरु आहे. मुंबईत होणार्‍या राजकीय सभा, रॅलीचे छायाचित्रण करण्यासाठी ड्रोन कंपन्यांकडे राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून ड्रोन कॅमेराची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रोन कंपन्या आहेत.

- Advertisement -

या कंपनीकडून सर्व प्रकारच्या परवानग्या मिळवून ड्रोन कॅमेरे पुरवले जात आहे. मात्र मुंबई पोलिसांनी २१ मार्च २९ मार्च पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी आणल्यामुळे ड्रोनला राजकीय पक्षाकडून मागणी असून ड्रोनची मागणी पूर्ण करता येत नसल्याचे मुंबईतील एका ड्रोन कंपनीच्या व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे.

एका ड्रोन कॅमेरासाठी २० हजार ते १ लाख रुपये दिवसाला आकारले जातात, त्यामध्ये पोलीस परवानगीसह इतर परवानग्या तसेच ड्रोन ऑपरेटर यांचा समावेश असतो. तसेच पोलीस परवानगी नसल्यास आम्ही स्वतः ड्रोन देण्यास टाळतो असे ड्रोन कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

ईशान्य मुंबईतील एका भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये ड्रोनचा वापर कऱण्यात आला होता, या ड्रोन कॅमेर्‍याने रॅलीचे चित्रीकरण सुरु होते. मात्र मुंबई पोलिसांकडून ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट, एअरक्राफ्ट, एरियल मिसाईल, पॅराग्लायडर आदींवर मुंबईत बंदी आणण्यात आली आहे. हि बंदी मार्च २१ ते मार्च २९ पर्यंत लागू आहे. कोटक यांच्या रॅलीत ड्रोनचा वापर कऱण्यात आला होता, या ड्रोनची परवानगी बाबत मुंबई पोलिसांकडे कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. रॅलीत ड्रोनचा वापर कऱण्यात आल्याचा एका व्हिडीओ व्हायरल होताच मुलुंड पोलिसांकडून ड्रोनच्या कारवाईसाठी पत्रव्यवहार कऱण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ड्रोनचा वापर हा ५० फुटाच्या खाली असेल तर त्यासाठी कोणतीही परवानगी लागत नाही. ड्ोन उडवणार्‍या कंपनीकडे त्याचा युनिक आयडी असतो. त्याप्रमाणेच ड्ोन उडवला गेला. ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी हा ड्ोन उडवला होता, पण तो ८ ते १० फुटांपर्यंतच होता. या पदयात्रेत अन्य कोणी सहभागी होवून कोणताही अनुचित प्रकार होवू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव याचा वापर केला होता. सर्व प्रक्रिया नियमानुसारच केलेली असून विरोधकांच्या हाती कोणताही मुद्दा नसल्याने त्यांच्याकडून याचे भांडवल केले जात आहे.
-विवेकानंद गुप्ता,सचिव, मुंबई भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -