घरमुंबईरेल्वेच्या निःशुल्क वायफायचा मिटर डाऊन

रेल्वेच्या निःशुल्क वायफायचा मिटर डाऊन

Subscribe

देशभरातील रेल्वे स्थानकांवरिल निःशुल्क वायफाय सुविधानंतर रेल्वे आता धावत्या लोकल गाड्यात वायफाय सुविधा देण्याच्या तयारीत आहे. मात्र रेल्वे स्थानकांवर सुरु असलेल्या नि:शुल्क वायफायच्या फज्जा उडाला आहे. मुंबईतील अनेक गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर निशुल्क वायफायचे नेटवर्क डाऊन असल्याने, या नि:शुल्क इंटरनेटच्या फायदा प्रवाशांना होताना दिसून येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वेच्या वायफायची क्रेज कमी होत आहे. मुंबई लोकलही मुबंईकरांची लाईफलाईन आहे.

दररोज रेल्वेतून प्रवास होत असल्याने रेल्वेत, स्थानकात प्रवाशांकडून रेल्वेच्या नि:शुल्क वायफायचा मोठा वापर रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येतो. मात्र सध्या मुंबईच्या अनेक रेल्वे स्थानकांवर रेल्वेचे निःशुल्क वायफायचे स्पीड डाऊन असल्याने रेल्वे प्रवाशी आता रेल्वेच्या वायफायकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासा दरम्यान मनोरंजनासाठी देशातील रेल्वे स्थानकांवर रेलटेलतर्फे वायफायची सुविधा पुरविण्यात आली आहे. रेलटेलने देशातील 1 हजार 600 रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा सुरू केली आहे. रेल्वेच्या वायफायचा सर्वाधिक वापर हा मुंबईत होतो. मात्र मागील काही महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या अनेक गर्दीच्या स्थानकावर वायफायचे स्पीड कमी असल्याच्या तक्रारी वाढ होत आहे.

- Advertisement -

या संबंधित दैनिक ‘आपलं महानगर’ने या संबंधित पाहणी केली असता ज्यात ठाणे, मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपर, माटुंगा, दादर आणि सीएसएमटीसारख्या अनेक रेल्वे स्थानकावरील वायफाय डाऊन असल्याचे निदर्शनात आले आहे. ठाणे रेल्वे स्थानकांवर इंटरनेट स्पीड ७.२० के.बी.पी.एस तर मुलुंड रेल्वे स्थानकावर १५ एम.बी.पी.एसची इंटरनेटचा स्पीड आहे. तर काही रेल्वे स्थानकांवर वायफायचे फक्त डबे लावले आहे. मात्र नेटवर्क सुद्धा येत नाही. त्यामुळे आता प्रवाशांना रेल्वेचे नि:शुल्क वायफाय नकोसे झाले आहे. यासंबंधित आम्ही रेलटेलचे अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकावरील वायफाय स्पीड हे तुमच्या मोबाइलवर अवलंबून असते. तसेच तुम्ही रेल्वे स्थानकाच्या कोणत्या ठिकाणी तुम्ही उभे आहात यावर सुद्धा वायफायचे नेटवर्क अवलंबून असते. जर तुम्ही वायफाय बॉक्सच्या दूर असलात तर वायफायचा नेटवर्क स्पीड कमी होतो.

रेल्वे स्थानकांवरील वायफायचा स्पीड काही स्थानकांवर अतिशय उत्तम आहे. मात्र या वायफाय नेटवर्क कनेक्ट-डिसकनेक्ट होत असल्याने प्रवाशांना वारंवार वायफाय कनेक्ट करावे लागते. त्यामुळे आता प्रवासी फक्त मोबाईल कंपन्यांच्या इंटरनेटचा वापर करताना दिसून येत आहे. पूर्वी ठाणे रेल्वे स्थानकांवर रेल्वेच्या नि:शुल्क वायफायचा उपयोग मी करत होतो. मात्र मागील काही दिवसांपासून सतत रेल्वे वायफाय डाऊन असल्याने मी रेल्वेच्या वायफायचा उपयोग करणे बंद केले आहे. रेल्वेने नि:शुल्क वायफाय तर दिला, मात्र नेहमीच्या वायफाय बॉक्सची देखरेख केली पाहिजे. अनेक वेळा हा बॉक्स सुद्धा बंद असतो, अशी प्रतिक्रिया ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवासी राकेश यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे. तर काही प्रवाशांनी सांगितले की जेव्हापासून मोबाईल कंपनीचे इंटरनेट सेवा स्वतः झाली आहे तेव्हापासून अनेक प्रवाशांनी रेल्वेचे नि:शुल्क वायफाय सुविधा घेणे सोडली आहे.

- Advertisement -

अशी आहे स्पीड
ठाणे = ७२० केबीपीएस
मुलुंड = १५ एमबीपीएस
घाटकोपर= ६.३ एमबीपीएस
दादर = ८६० केबीपीएस
कुर्ला = ४. ४ एमबीपीएस
सीएसटीएम = ७०० केबीपीएस

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -