Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कोण करणार? रेल्वे-महापालिका आमनेसामने

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कोण करणार? रेल्वे-महापालिका आमनेसामने

Subscribe

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. मुंबईच्या सखल भागांत प्रचंड पाणी साचतं. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई केली जाते. मात्र यंदा या नाले सफाईवरून महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये जुंपण्याची शक्यता आहे. कारण नुकताच महापालिका आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. मुंबईच्या सखल भागांत प्रचंड पाणी साचतं. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई केली जाते. मात्र यंदा या नाले सफाईवरून महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये जुंपण्याची शक्यता आहे. कारण नुकताच महापालिका आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत रेल्वेने महापालिकेकडून नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नसल्याचा ठपका ठेवला आहे. (Disagreement Between Railway And BMC Administration Over Cleaning Of Drains Even Before Monsoon)

पावसाळ्यात दरवर्षी मुंबई उपनगरात विक्रमी पावसाची नोंद होते. मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचते. पाणी साचल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होतो. लोकल गाड्या विस्कळीत होऊन प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून दरवर्षी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर मान्सूनपूर्व कामे केली जातात.

- Advertisement -

उपनगरीय रेल्वे मार्गांवर रेल्वेच्या हद्दीत नालेसफाई, मोऱ्यांची (कल्व्हर्ट) सफाई करण्यात येते. सद्यस्थितीत मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर विविध मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. या कामाचा आढावा घेण्यासाठी सतत महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र सुरु झाले आहेत.

नुकताच नालेसफाई संदर्भात पश्चिम रेल्वेची आणि बृहमुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत रेल्वेने पालिका प्रशासनाला नालेसफाई योद्धपद्धतीने झाले आहे की नाही? संदर्भात आढावा घेण्याची आणि उर्वरित काम कंत्राटदारनाकडून तात्काळ पूर्ण करून घेण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

सध्या रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधील गाळ उपसण्यासह मोऱ्यांच्या स्वच्छतेची कामे, विविध ठिकाणी पंप बसविणेचे काम युद्धपातळीयावर सुरु आहे.


हेही वाचा – मोठी बातमी : उद्धव ठाकरेंपासून मला तोडण्याचा प्रयत्न, संजय राऊत असं का म्हणाले?

- Advertisment -