घरताज्या घडामोडीकोरोना काळातील १५९ गैरहजर बेस्ट कर्मचारी बडतर्फ

कोरोना काळातील १५९ गैरहजर बेस्ट कर्मचारी बडतर्फ

Subscribe

बेस्ट उपक्रमात कोरोनाच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा देण्याऐवजी गैरहजर राहिलेल्या कर्मचार्‍यांरवर बडतर्फीची कारवाई सुरुच ठेवली आहे. कारवाईचा हा आकडा वाढतच असून आतापर्यंत १५९ कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई कऱण्यात आली आहे. यामध्ये चालक आणि वाहकांची संख्या मोठी आहे. मात्र कर्मचार्‍यांच्या अडचणी न समझताही कारवाई करत असल्याने कर्मचार्‍यामध्ये नाराजीचे वातावरण आहे.

कारवाईमुळे नाराजीचे वातावरण

कोरोनाच्या पाश्वभूमीवर चार महिन्यापासून बेस्ट उपक्रमामार्फत मुंबई आणि परिसरातील अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी विशेष बससेवा चालविण्यात आली. बससेवा चालविण्यासाठी प्रशासनाने परिवहन सेवेतील कर्मचार्‍यासाठी १०० टक्के उपस्थितीच्या सूचना केल्या होत्या. तर विद्युत विभागासह ईतर विभागातील कर्मचार्यांना १५ टक्के उपस्थिती बंधनकारक केली होती. परंतु परिवहन विभागातील बहुतांश कर्मचारी गैरहजर राहिल्याने बेस्टला अनेक गाड्या आगाराबाहेर काढणे शक्य झाले नाहीत.त्यामुळे बेस्टच्या विशेष बससेवेवर मर्यादा आली. तसेच उपस्थित कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढला. त्यामुळे प्रशासनाने कर्मचार्‍यांना चार्जशीट देण्यास सुरुवात केली. कर्मचार्‍यांना चार्जशीट देण्यात आल्यानंतर कर्मचारी कामावर हजर होऊ लागले. परंतु चार्जशीट दिल्यानंतरही कामावर हजर न राहिलेल्या कर्मचार्‍यांवर प्रशासनाने बडतर्फीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बेस्टमधील ११२ कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले होते. याकारवाईत वाढ झाली असून आता संख्या १५९ झाली आहे. यामध्ये परिवहन सेवेतील कर्मचार्‍यांची संख्या जास्त असून त्यापाठोपाठ अन्य विभागातील कर्मचारी आहेत. जे कर्मचारी चार्जशीट दिल्यानंतर कर्तव्यावर परतले त्यांच्यावर वेतनवाढ रोखण्याचीही लवकरच कारवाई केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -