महाराष्ट्रातील विधवा प्रथेचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी पुढाकार घेणार : डॉ. नीलम गोऱ्हे

Dr. Neelam Gorhe said that he would take initiative for the eradication of widowhood in Maharashtra.
Dr. Neelam Gorhe said that he would take initiative for the eradication of widowhood in Maharashtra.

स्त्री आधार केंद्र गेली पस्तीस वर्षे महिलांच्या आत्मसन्मानासाठी कार्य करत आहे. विधवा महिलांना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार आहे. या विषयावर महाराष्ट्र मध्ये सर्व इच्छुक सरपंच आणि महिला कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्था यांच्यासोबत लवकरच एक कार्यशाळा पुणे येथे घेण्यात येणार आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केले. विधवा महिला सन्मान संरक्षण अभियान आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज एका बैठकीचे आयोजन विधान भवन मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘समाजातील अनेक स्तरातून अनेक अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांचे उच्चाटन होण्याची मागणी गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात होत आहे. प्रबोधनकार ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले, अशा अनेक समाजधुरीणांनी महिलांवरील अन्यायाच्या विरुद्ध अनेकदा क्रांतिकारी लिखाण आणि विचार समाजासमोर मांडले आहेत. एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात महिलांना त्यांच्या पतीच्या निधनानंतर अजूनही अनिष्ट चालीरीतींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा त्यांच्यावर केशवपन करणे, दागिने काढून घेणे, गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू पुसण्याचा दुर्दैवी प्रसंग येतो. हे सर्व महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारे आणि सामाजिक प्रतिष्ठा कमी करणारे आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हेरवाड गावाने आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव या गावाने त्यांच्या गावात विधवा प्रथांना समूळ उच्चाटन करण्याचा ठराव केला आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही गावांचे अभिनंदन त्यांनी केले आहे.

या बैठकीला करमाळा येथील महात्मा फुले सामाजिक संस्थेचे प्रमोद झिंजाडे, कालिंदी ठूबे, राजू शिरसाठ, अशोक पिंगळे, स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, सचिव अपर्णा पाठक, अनिता शिंदे, विभावरी कांबळे, अश्विनी शिंदे, संगीता मालकर, सुनीता मोरे, अस्मिता गायकवाड, वैशाली घोरपडे, अंजू वाघमारे, रमेश शेलार, अस्मिता गायकवाड, मंगल चव्हाण, लहानू आबनावे, लता बोराडे, मंगल थोरात, राजश्री धेंडे, राजश्री जगताप, सुनीता शिरसाट, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.