घरमुंबईखाशील तर होशील बोंबलावानी!

खाशील तर होशील बोंबलावानी!

Subscribe

सुक्या मासळीचा भाव वधारला

समुद्रातील मासेमारीचे प्रमाण सध्या कमी असल्यामुळे ओल्या मासळीचे बाजारातील प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे मासे खवय्ये सुक्या मासळीकडे वळू लागले. परिणामी सुक्या मासळीच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचे दिसत आहे. यावर्षी सुक्या मासळीला सुगीचे दिवस दोन महिने आधीच आले आहेत. यामध्ये बोंबिल व सोड्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. सुक्या मासळीला सुगीचे दिवस आले असले तरी आतापासून सुकी मासळी मोठ्या प्रमाणावर विक्री होऊ लागली तर आगोटी व मासेमारीच्या काळात या मासळीचे दर आणखीनच गगनाला भिडतील. कारण त्यावेळी मासळीचे बाजारातील प्रमाणही कमी असेल व मागणी वाढलेली असेल; त्याचा परिणाम या मासळीवर नक्कीच होईल, असे जाणकारांचे मत आहे. यावर्षी सुक्या मासळीच्या खरेदीला लवकरच सुरूवात झाल्यामुळे पावसाळ्यात सुक्या मासळीची कमतरता जाणवू शकते. परिणामी सुक्या मासळीचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता कोळी बांधवांडून वर्तविली जात आहे.

दिवसभर उन्हात काम केल्यावर शाकाहार ऐवजी मांसाहार करण्याकडे जास्त कल असतो. अशावेळी ओली मासळी मिळत नसल्यामुळे सुकी मासळी चांगलीच कामाला येत असल्याचे शेतकरी सांगतो. सुक्या मासळीमध्ये सुकट, आंबाड, मोठी वाकटी, लहान वाकटी, बोंबिल, मांदेली, खारी सुरमई, बांगडा, खाडे, कोळंबी सोड्यांना ग्राहकांची पसंती असल्याचे चित्र मासळी बाजारात दिसून येते. मागणी बरोबरच किमतीतही वाढ झाली असून, गेल्या महिन्याच्या तुलनेत सुक्या मासळीचे दर 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या सुके बोंबिल, सुकट, वाकटी व आंबाड या सुक्या मासळीला विशेष मागणी आसल्याचे मासळी विक्रेत्या नीता लाल यांनी सांगितले. पोयनाड, वडखळ, अलिबाग, रेवदंडा, बोर्ली, एकदरा, मुरूड, पेण, पाली, परळी, उरण, करंजा, मोरा, कर्जत, नेरळ, खोपोली, खालापूर, रोहे, बोर्लीपंचतन, श्रीवर्धन, महाड, म्हसळे, तळे, पोलादपूर, माणगाव या सुक्या मच्छीच्या बाजारपेठा आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -