घरमहाराष्ट्रपुणेलागोपाठ सुट्ट्यांचा परिणाम; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

लागोपाठ सुट्ट्यांचा परिणाम; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Subscribe

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर प्रंचड वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. जवळपास दीड किलोमीटरमपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर प्रंचड वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. जवळपास दीड किलोमीटरमपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. ( Effect of consecutive holidays Heavy traffic jam on Mumbai Pune Expressway )

एक्स्प्रेसवेवरील कोंडीचा हा आजचा दुसरा दिवस आहे. सकाळीच पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाल्याने अनेकांचे हाल झाले. आज कामकाजाचा आठवड्याचा अखेरचा दिवस असल्याने वाहनांची गर्दी आहे. तसेच, अवजड वाहनेदेखील मोठ्या प्रमाणावर होती. यामुळे खंडाळा घाटातील वेड्या वाकड्या वळणांवर वाहने अडकल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisement -

महिन्याभरातील तिसरी वेळ

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडीची ही तिसरी वेळ आहे. आता चौथा शनिवार, रविवार आणि 1 मे, कामगार दिन यामुळे सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत. या सुट्टयांच्या पार्श्वभूमीवर लोक फिरायला जात आहेत. तसंच, गुड फ्रायडे, दुसरा शनिवार यामुळे देखील 7 एप्रिलला मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. 14 एप्रिल, आंबेडकर जयंती, तसंच त्याला लागून आलेल्या शनिवार, रविवारमुळेदेखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

( हेही वाचा: खुशखबर! बिल्डरकडून मिळणारे भाडे करपात्र नाही, आयकर विभागाचा मोठा निर्णय )

- Advertisement -

12 वाहनं एकमेकांवर आदळली

मुंबई- पुणए एक्सप्रेसवे वर खोपोली एक्झिटजवळ 12 वाहनांचा काल, 27 एप्रिलला भीषण अपघात झाला होता. सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या असून अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. या भयंकर अपघातानंतर दृतगती महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. खोपोली एक्झिट जवळील उतरणीच्या भागात गाड्या वेगात येत असल्यामुळे सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार धडकल्या. काही गाड्या एकमेकांवर आदळल्या. गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -