घरमुंबईखडसे नेहमीच आमच्या संपर्कात

खडसे नेहमीच आमच्या संपर्कात

Subscribe

एकनाथ खडसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत, असा प्रश्न विचारल्यावर, खडसे हे नेहमीच आमच्या संपर्कात होते, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एकनाथ खडसेंनी कालच भाजपवर आगपाखड केल्यामुळे त्यांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार यांच्याविरोधातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले. मी, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा फटका भाजपला बसल्याचा घणाघातही खडसेंनी केला होता.आधी जे सत्ताधारी होते, त्यांच्याविरोधातही ईडीची चौकशी करता येण्यासारखे पुरावे आहेत. मात्र सूडाचे राजकारण करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण सत्तेत येताच अचानक त्यांचे नाव कसे काय ईडी चौकशीसाठी समोर आले, हा प्रश्न पडतो. राष्ट्रपती भवन ते राजभवन आणि सीबीआय ते ईडी अशा केंद्राच्या ताब्यातील सर्व संस्थांचा वापर राज्यातील सत्ताधार्‍यांना अडचणीत आणण्यासाठी केला जात आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य पुढे नेण्यास केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे वचन त्यांनी दिले. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला त्यांनी यावे ही अपेक्षा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी ‘सामना’चे संपादकपद सोडले                                                                                उद्धव ठाकरेंनी ‘सामना’चे संपादकपद सोडले, हा आमचा अंतर्गत निर्णय आहे. ते मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार असल्यामुळे काही संकेत पाळावे लागतात, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -