घरमुंबईआरटीईतील प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ

आरटीईतील प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही अनेक पालक आपल्या गावी अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संधी वाया जाऊ नये यासाठी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही अनेक पालक आपल्या गावी अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संधी वाया जाऊ नये यासाठी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

आरटीई प्रवेशासाठी १७ मार्चला प्रवेशाची पहिली सोडत काढण्यात आली. राज्यातील ९ हजार ३३१ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी १ लाख १५ हजार ४७७ हजार जागा नोंदविल्या आहेत. पहिल्या यादीतील प्रवेशानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. मात्र यामध्ये अनेक विद्यार्थी लॉकडाऊन व शाळा बंद असल्याकारणांनी प्रवेशपसून वंचित राहिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. जागा रिक्त असूनही प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाहीत. यामुळे आता २८ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -