घरताज्या घडामोडीदादरमध्ये कापडाच्या दुकानाला आग

दादरमध्ये कापडाच्या दुकानाला आग

Subscribe

दादरमध्ये कापडाच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.

डोंबिवलीमध्ये एमआयडीसी केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. दादरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. तसेच या आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

- Advertisement -

आगीचे सत्र सुरुच

माझगावमध्ये जीएसटी भवनच्या इमारतीला मंगळवारी दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली होती. सुमारे तीन तासांनंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत ऑडिट रिपोर्ट आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे या आगीबद्दल संशय व्यक्त केला जात असताना सर्व रिपोर्टचे संगणकीकरण करण्यात आले असून ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. आग लागलेला दहावा मजला अनधिकृत असल्याची चर्चा होती.

माझगावमध्ये जीएसटी भवनच्या इमारतीला मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना ताजी असताना बुधवारी डोंबिवलीमध्ये एमआयडीसी केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीत आग लागली होती. ही कंपनी त्याच रस्त्यावर आहे जेथे काही दिवसांपूर्वी प्रदुषणामुळे रस्ते गुलाबी झाले होते. त्याच भागातील डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीत ही भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न आले. गेल्या १६ तासांपासून ही आग धुमसत होती. जवळपासच्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर घरे रिकामी करण्याचे यावेळी आवाहन देखील करण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात रेकॉर्डब्रेक वीजपुरवठा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -