घरगणेशोत्सव 2022पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका प्रशासनाची जय्यत तयारी

पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका प्रशासनाची जय्यत तयारी

Subscribe

मुंबईसह राज्यभरात दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारीनंतर पुन्हा एकदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. 31 ऑगस्ट रोजी बाप्पा घराघरांमध्ये विराजित झाले. त्यानंतर आज पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी गणेश भक्तांसह महापालिका प्रशासनही तयार झाले आहे.

मुंबईसह राज्यभरात दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारीनंतर पुन्हा एकदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. 31 ऑगस्ट रोजी बाप्पा घराघरांमध्ये विराजित झाले. त्यानंतर आज पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी गणेश भक्तांसह महापालिका प्रशासनही तयार झाले आहे. बाप्पाच्या विसर्जन करण्यात येणाऱ्या ठिकाणी म्हणजेच चौपाटी आणि कृत्रिम तलाव येथे विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (ganeshotsav 2022 five days ganpati visarjan special preparation from bmc)

दीड दिवसांच्या बाप्पानंतर आज पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाट्यांवर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या असून, समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

- Advertisement -

प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे, तसेच यासाठी तब्बल 10 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे. परंतु, इतर जड वाहनांना या दिवशी मुंबईत प्रवेश करता येणार नाही.

मुंबई वाहतूक पोलिसांकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गणपती विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा, तसेच विसर्जनावेळी मुंबईत कोणत्या ही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबईत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्यावतीने गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्र किनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी तयारी करण्यात आली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक ही तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. यंदा दीड दिवसांच्या गणपतींच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – ‘महागाई पर हल्ला बोल’; कॉग्रेसची भाजपा विरोधात दिल्लीत रॅली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -