बोईसरमध्ये गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू; पळून जाताना माथेफिरू तरुणाचाही मृत्यू

Girl dies on the spot in firing in Boisar Mathepuru youth injured while running away

वाणगाव ( सचिन पाटील):  बोईसर टीमा हॉस्पीटल जवळ तरुणाने केलेल्या गोळीबारात तरुणीचा मृत्यू झाला आहे.गोळीबार करून पळून जात असलेला तरुण एका गाडीला धडकून जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर माथेफिरू तरुणाचाही अपघाती मृत्यू झाला आहे. कृष्णा यादव असं या तरुणाचे नाव आहे.गोळीबाराची ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून पुढील तपास सुरू आहे.

बोईसरमधील टीमा रुग्णालयाच्या प्रवेशदवाराजवळ दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कृष्णा यादव (रा. कोलवडे) या तरुणाने नेहा मेहतो रा.सरावली वय २१ वर्षे या तरुणीची स्वतःजवळील पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत हत्या केली आहे.गोळी मारून पळून जात असताना डी डेकोर कंपनीजवळ मिलीटरीच्या गाडीला धडकून आरोपी तरुण हा जखमी झाला होता मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बोईसर पोलिसांना या घटनेची खबर मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेत टीमा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माथेफिरू तरुणाने प्रेम प्रकरणातून गोळी झाडून तरुणीची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड,उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा,पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे उपस्थित असून या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.


केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला