घरमुंबईबच्चे कंपनीसाठी GoodNews! आता घरबसल्या करता येणार राणीच्या बागेची 'व्हर्च्युअल टूर'

बच्चे कंपनीसाठी GoodNews! आता घरबसल्या करता येणार राणीच्या बागेची ‘व्हर्च्युअल टूर’

Subscribe

बच्चे कंपनीला कुटुंबियांसह राणी बागेतील प्राणी पाहण्याची संधी

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अद्याप कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. कोरोनाचे प्रमाण वाढू नये यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. परिणामी राणी बागेच्या गेटलाही ‘लॉक’ लावण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांचा विषेशतः बच्चे कंपनीचा हिरमोड झाला आहे. मात्र, आता कोरोनाचे नो टेन्शन. बच्चे कंपनीला व त्यांच्या कुटुंबियांनाही अट घरबसल्या राणी बागेतील पेंग्विन, बिबट्या, पक्षी यांना बघण्या संधी राणी बाग व्यवस्थपनद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे.

‘व्‍हर्च्‍युअल टूर’ च्या माध्यमातून भायखळा, राणी बागेतील वन्यप्राणी, पक्षी, तसेच परिसरातील झाडे आणि इतर जैवविविधता ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दर्शकांकरीता ऑनलाईन दाखविण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वन्यप्राणी व पक्षी , कीटक, फुलपाखरे, झाडे, पर्यावरण याबद्दल लोकांना माहिती देणे हा मुख्य उद्देश आहे. @themumbaizoo या नावाने असलेल्या सर्व समाज माध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, यू – ट्यूब, इंस्टाग्राम) राणी बागेची ‘व्‍हर्च्‍युअल टूर’ (आभासी सहल) ची ध्वनिचित्रफीत सर्वाना पाहता येणार आहे.

- Advertisement -

जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त राणी बाग (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या) ‘व्‍हर्च्‍युअल टूर’ (आभासी सहल) च्‍या निवडक दृश्य ऑनलाईन प्रक्षेपणाचा शुभारंभ भायखळा येथील महापौर निवासस्थानी
महापौर किशोरी पेडणेकर यांच्‍या हस्‍ते शनिवारी पार पडला. ‘व्हर्च्युअल टूर’ लहान मुलांना व नागरिकांना आनंद देणारी ठरणार असल्याचे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. ‘व्‍हर्च्‍युअल टूर’ च्‍या निवडक दृश्यांमध्ये पशुपक्षांच्या बारीक हालचाली, डोळ्यांच्या हालचाली तसेच भाव टिपण्यात आले आहे. मुंबईच्या नागरिकांना आता हा अनुभव अनुभवता येणार आहे. तसेच जतन केलेली दुर्मिळ माहिती सुद्धा उपलब्ध होणार आहे, याबद्दल प्राणिसंग्रहालयाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करीत असल्याचे महापौरांनी सांगितले.

याप्रसंगी उप महापौर अँड.सुहास वाडकर, राणी बागेचे (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय) संचालक डॉ. संजय त्रिपाठी, ऑनलाइन व्याख्याता डॉ. सुनाली खन्ना तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.
यावेळी, महापौर किशोरी पेडणेकर व उप महापौर अँड. सुहास वाडकर यांच्या हस्ते प्राणिसंग्रहालयात दुर्मिळ अशा कृष्णवड प्रजातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. कुरुक्षेत्रानंतर राणी बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय) एकमेव दुर्मिळ कृष्णवडाचे झाड आहे. त्यानंतर आता या दुसऱ्या कृष्णवड वृक्षाचे रोपण करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -