घरमुंबईनिवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षकांना सरकारचा दिलासा

निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षकांना सरकारचा दिलासा

Subscribe

सरकारच्या या निर्णयामुळे समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या ११८ उमेदवारांना दिलासा मिळेल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आधी निवड करण्यात आलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदावरील ११८ उमेदवारांना परिवहन विभागाने मोठा दिलासा दिला आहे. या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासीक निर्णय घेण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.

सुधारीत निकाल ‍जाहीर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदासाठी परिक्षा घेण्यात आली होती. ३१ मार्च, २०१८ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या पदाकरिता ८३२ उमेदवारांची शासनास शिफारस केली. तथापि, दरम्यानच्या काळात सामान्य प्रशासन विभागाच्या १९ डिसेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी आणि समांतर आरक्षणाच्या मुद्यावर मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी ८ ऑगस्ट, २०१९ रोजी दिलेला निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुधारीत निकाल ‍जाहीर केला.

- Advertisement -

नियमानुसार नियुक्ती

या निकालानुसार आयोगाने ११ सप्टेंबर, २०१९ रोजी नव्याने ११८ उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली. त्याचवेळी आधीच्या निकालातील ११८ उमेदवारांना यादीमधून वगळण्यात आले. आता शासनाने असा निर्णय घेतला आहे की, ११ सप्टेंबर, २०१९ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शासनाकडे शिफारस केलेल्या सर्व ८३२ उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. याशिवाय या यादीमधून वगळण्यात आलेल्या ११८ उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येईल. न्यायालयाच्या निर्णयास अनुसरुन आणि नियमानुसार तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करुन या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे.

गेली काही वर्षे हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. त्यांना वगळणे योग्य होणार नाही अशी शासनाची भावना आहे. त्यामुळे शासन प्रथमच अशा प्रकारचा ऐतिहासीक निर्णय घेत आहे.
दिवाकर रावते, परिवहन मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -