घरमुंबईआम्ही बेळगावला जाणारच, तुमच्यात धमक असेल या; हसन मुश्रीफांचे भाजपा नेत्यांना...

आम्ही बेळगावला जाणारच, तुमच्यात धमक असेल या; हसन मुश्रीफांचे भाजपा नेत्यांना आव्हान

Subscribe

कोल्हापूर – आम्ही १९ डिसेंबरला बेळगावला जाणारच. तुमच्यात धमक असेल या, असा इशारा मविआचे आमदार हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना केले आहे. कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू समाधीस्थळ धरणे आंदोलन मविआकडून करण्यात आले. यावेळी माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव उपस्थित होते.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, भाजपाच्या नेत्यांनी केलेली बेताल वक्तव्ये याविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कारण नसताना षडयंत्र रचत आहेत. जाणूनबुजून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. यामुळे अशांतता निर्माण होतेय. अमित यांनाही हा गडी घाबरत नाही, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

- Advertisement -

आम्ही कालही आपल्यासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही तुमच्यासोबत राहू. आमचा संयम सुटला तर हा प्रश्न निकाली लागण्यास वेळ लागणार नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सीमाभागातील बांधवांच्या कायम पाठीशी राहू. महामानवांचा अपमान करून संविधान बदलण्याचा हा डाव दिसत आहे, असा हल्लाबोल सतेज पाटील यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -