घरमुंबईअंधेरीतील पूल दुर्घटनेमध्ये ५ जखमी; ढिगारा हटवण्याचे काम सुरू

अंधेरीतील पूल दुर्घटनेमध्ये ५ जखमी; ढिगारा हटवण्याचे काम सुरू

Subscribe

अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेची सेवा ठप्प झाली आहे. सकाळी ७.३० वाजता झालेल्या दुर्घटनेमध्ये ५ जण जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

अंधेरीतील पुल दुर्घटनेमध्ये ५ जण जखमी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. जखमींमध्ये ४ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. द्वारलीप्रसाद शर्मा ( ४७ ), गिंधनी सिंघ (४६ ), मनोज मेहता ( ५२ ), हरीश कोहली ( ४५ ) आणि एक महिला जखमी झाली आहे. दरम्यान ६० वर्षीय महिला जखमी झाली असून तिचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. जखमींवर सध्या कुपर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, मनोज मेहता आणि ६० वर्षीय महिलेवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. सकाळी ७.३० वाजता झालेल्या या दुर्घटनेनंतर वांद्रे ते चर्चगेट आणि अंधेरी ते विरार लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी पुल कोसळल्याने चाकरमान्यांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांनी बस आणि रिक्षा पकडण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर देखील त्याचा ताण जाणवला. परिणामी मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत जोरदार पाऊस असून सखल भागांमध्ये देखील पाणी साचल्याचे चित्र पाहायाला मिळत आहे. शिवाय मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा देखील उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते सायन या रेल्वे स्थानकादरम्यान पाणी साचल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

मोठा अनर्थ टळला

मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकलकडे पाहिले जाते. दररोज लाखो प्रवासी हे लोकलने प्रवास करतात. सकाळी ७.३० वाजता पूल कोसळल्यानंतर नशीब बलवत्तर म्हणून अशीच प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिली. कारण पुलाचा हाच भाग जर रेल्वेवरती कोसळला असता तर मोठा अनर्थ झाला असता अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, पूल कोसळल्यानंतर पश्चिम रेल्वेची सेवा नेमकी केव्हा सुरू होईल याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. घटनेचे गांभीर्य पाहता आज दिवसभरात रेल्वे सेवा ट्रॅकवर येईल का? असा प्रश्न आता प्रवासी  विचारू लागले आहेत.

मुंबईत पावसाचा जोर

मुंबईसह उपनगरामध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाताना मुंबईकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. रेल्वेसेवेसह बस आणि रिक्षा सेवेवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे देखील चित्र आहे. सध्या जरी पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी पावसाचे वातावरण मात्र कायम आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारी दिवसभर देखील जोरदार बँटींग करणार असेच वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -