घरमुंबईमुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, पुढचे ४८ तास पाऊस कायम

मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, पुढचे ४८ तास पाऊस कायम

Subscribe

दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या हवामान खात्याकडून २४ जुलै या दिवशी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. तसंच पुढच्या ४८ तासात असाच पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवात झाली आहे. नवी मुंबई, ठाणे, वसई, नालासोपारा, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा, अंधेरी, हिंदमाता आणि लालबाग या सखल भागात पाणी साचलं होतं. मुंबईच्या हवामान खात्याकडून दोन दिवसांपूर्वी २४ जुलै या दिवशी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, बुधवारी सकाळपासूनच अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. शिवाय, दिवसभर असाच पाऊस मुंबईत पडणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसंच, पुढच्या ४८ तासात असाच पाऊस पडणार असल्याचं ही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरूवात झालेल्या पावसाने आधी मुंबईतील कुलाबा परिसरात हजेरी लावली. त्यानंतर मध्य मुंबईत पाऊस पडायला सुरूवात झाली ज्याची अजूनही संततधार सुरू आहे.

- Advertisement -

रात्रीपासून आतापर्यंत कुलाबा १७४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, उपनगरातील सांताक्रूझमध्ये ८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकूण मुंबईत गेल्या १२ ते १४ तासांमध्ये चांगला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुढचे ७ दिवस मुसळधार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने दडी मारली होती. पण, मंगळवारी मध्यरात्री पासून सुरू झालेला पाऊस बुधवारी दिवसभर तर पुढचे ४८ तास असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचे उपसंचालक के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

‘या महिन्याच्या पुढच्या ६ ते ७ दिवसांत मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सक्रिय असणार आहे. हवामान खात्याकडून तसा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच मुंबईसह महाराष्ट्राच्या काही ठिकाणी पाऊस पडेल. मध्यरात्रीपासून कुलाबा परिसरात १७४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर, सांताक्रूझमध्ये ८४ मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभर पाऊस राहून तेवढा तीव्र पाऊस पडणार नाही. पण, याबाबतच्या सुचना त्या संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.’, असे
हवामान खात्याचे उपसंचालक के.एस. होसाळीकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -