Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई कोरोना महामारीदरम्यान गृहनिर्माण क्षेत्रात तेजी; घरांच्या मागणीत ५३ टक्क्यांनी वाढ

कोरोना महामारीदरम्यान गृहनिर्माण क्षेत्रात तेजी; घरांच्या मागणीत ५३ टक्क्यांनी वाढ

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू झाल्यापासून सर्वच क्षेत्राला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. असे असताना देखील गृहनिर्माण क्षेत्रात मात्र तेजी आल्याचे दिसून आले आहे. नवीन गृहप्रकल्प आणि घरांच्या मागणी, खरेदीत वाढ होत आहे. यंदा जानेवारी ते जूनपर्यंतच्या कालावधीत घरांची मागणी आणि नव्या प्रकल्पांमधील घरांची संख्याही तब्बल ५३ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.

सहा महिन्यात २८,६०७ घरांची खरेदी

गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून गृहनिर्माण क्षेत्रावर विपरीत परिणाम झाल्याचे समोर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२०मध्ये एकही घर खरेदी झाले नव्हते. त्यानंतर विविध सरकारी योजना, स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात अशा कारणांमुळे परिस्थिती सुधारत गेली आणि खरेदी-विक्रीप्रमाणेच नवीन प्रकल्पदेखील कार्यान्वित झाले. ‘नाईट फ्रॅंक इंडिया’ संस्थेने सादर केलेल्या सहामाहीतील अहवालातून घरांच्या मागणीत वाढ झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये मुंबईसह देशातील मुख्य आठ शहरांचा समावेश असून मुंबई महानगर प्रदेशात गेल्या वर्षी जानेवारी ते जूनपर्यंत १८,६४६ घरांची खरेदी झाली होती. याच्या तुलनेत यंदाच्या सहा महिन्यात २८,६०७ घरांची खरेदी झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत घर खरेदीच्या प्रमाणात वाढ

- Advertisement -

गेल्यावर्षी पहिल्या सहामाहीत गृहखरेदीत १३ टक्के वाढ झाली असून वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, सांताक्रूझ, विलेपार्ले, दहिसरमध्ये ही वाढ झाली आहे. मात्र या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात १९ टक्के नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या सहामाहीत घरांच्या मागणीत झालेली ५३ टक्के वाढ असून यापैकी मध्य मुंबईत हे प्रमाण एक टक्क्याने वाढले तर ठाण्यातील घरांच्या खरेदीत यंदा ४ अंकांनी वाढ होऊन ती १५ टक्क्यांवर पोहोचली असल्याचे सांगितले जात आहे.


सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र, पण पक्षासाठी जे करायचं ते काँग्रेसनं करावं – प्रफुल्ल पटेल

- Advertisement -