घरमुंबईआयआयटीमध्ये मोकाट गुरांसाठी बांधणार गोठा?

आयआयटीमध्ये मोकाट गुरांसाठी बांधणार गोठा?

Subscribe

मुंबईतील उच्च शिक्षण देणाऱ्या पवई येथील आयआयटीमध्ये मोकाट गुरांचा वावर वाढल्यामुळे आता त्यांच्याकरता गोठा बांधण्यात येणार आहे.

मुंबईतील उच्च शिक्षण देणाऱ्या पवई येथील आयआयटीमध्ये मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कधी वर्गात गाय येते तर कधी बैलाचे येणे. या सततच्या घटनांमुळे आयआयटीचे प्रशासन हैराण झाले आहे. या मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी संकुलात आता चक्क गोठा बांधण्याची समितीकडे शिफारस करण्यात आली आहे.
आयआयटी मुंबई संकुलात सध्या गाय – बैलांचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी बैलाच्या झुंजीत एका तरुणाला धडक दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर एक मोकाट गाय थेट वर्गातच शिरली होती. ही मोकाट गाय वर्गात शिरल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा एका खोलीत बैल घुसल्याची घटना घडली होती. सततच्या या घटनांमुळे आयआयटीच्या प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे याप्रकरणी विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.

वसतिगृहामागील मोकळा परिसर वापरणार

या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने संकुलातील मोकाट गुरांची व्यवस्था करावी यासाठी विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता प्रा. तपनेंदू कुंडू यांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापकांची एक समिती स्थापन केली. या समितीने अनेक बैठका घेतल्या. संस्थेतील गायी बाहेर जाऊ नये, असे बहुतांश रहिवाशांना वाटत असल्याचे मत या बैठकांमध्ये मांडण्यात आले. त्यामुळे अखेर गायी संकुलातच सांभाळण्याची तयारी समितीने दर्शविली आहे. यासाठी आठ क्रमांकाच्या वसतिगृहामागील मोकळा परिसर राखीव ठेवण्याची सूचना समितीने केली आहे.

- Advertisement -

जीपीएस ट्रॅकर बसविणार

  • गायींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यावर जीपीएस ट्रॅकर बसविण्यात येणार आहे. याद्वारे त्या नेमक्या कुठे आहेत हे सुरक्षा रक्षक तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना समजू शकेल.
  • गायींची काळजी घेण्यासाठी काही जणांची नियुक्ती केली जाईल.
  • गोरक्षणासाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांची नियुक्ती करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
  • गायींना त्यांची हक्काची जागा मिळावी यासाठी गोठा उभारण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

    हेही वाचा – भाजपने दिली शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -