घरमुंबईभायखळा कारागृहात कैंद्यांना अन्नातून विषबाधा

भायखळा कारागृहात कैंद्यांना अन्नातून विषबाधा

Subscribe

मुंबईच्या कारागृहातील कैद्यांना दिलं जाणार अन्न नित्कृष्ट दर्जाचं असतं हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भायखळा कारागृहातील महिला आणि पुरुष मिळून ८७ कैद्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडी. मात्र विषबाधा कधी झाली याबद्दल अजूनही माहिती मिळू शकली नाही. तुरुंगात देण्यात आलेल्या अन्नाचे नमुने अन्न व औषध विभागाकडे पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालानंतर अधिकृत रित्या माहिती दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आता या कैद्यांना तुरुंगात दिल्यागेलेल्या जेवणातूनच विषबाधा झाली असल्याचं महिला आयोगाच्या सदस्यांनी दिली. जे. जे. रुग्णालयात कैद्यांशी घेतलेल्या भेटीदरम्यान त्यांना ही माहिती मिळाली. महिला आयोगाच्या सदस्या विंदा किर्तीकर आणि आशा लांडगे यांनी शनिवारी वॉर्डमध्ये असणाऱ्या कैदी महिलांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना दिलं जाणारं अन्न हे अतिशय नित्कृष्ट दर्जाचं असतं असं काही महिला कैद्यांनी सांगितले. आठवडाभरापूर्वीच महिला आयोगाच्या सदस्यांनी महाराष्ट्रातील काही कारागृहांना भेट दिली होती. तेव्हा जेवण चांगलं देत असल्याचं निदर्शनास आलं होतं. शिवाय, पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर लावलं असल्याचं ही समोर आले. पण, आता ही विषबाधा अन्नातूनच झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

७९ कैद्यांना देणार डिस्चार्ज

शुक्रवारी संध्याकाळपर्यंत भायखळा कारागृहातील ८७ कैद्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील ८५ महिला कैदी होत्या. एक ३ महिन्यांचं बाळ होतं आणि एका पुरूष कैद्याला दाखल करण्यात आलं होतं. त्यातील शनिवारी संध्याकाळपर्यंत ७९ कैद्यांना डिस्चार्ज करण्यात आलं. अजूनही ८ कैद्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. त्यातील ४ महिला मेडिसीन विभागात असणार आहेत. तर, ३ गर्भवती महिलांना प्रसूती विभागात ठेवण्यात आलं आहे. तर, एका पुरुषाला वॉर्ड नंबर ९ मध्ये ठेवण्यात आलं आहे. अजूनही रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. आज सायंकाळी ८ अन्यकैद्यांना दाखल करण्यात आले.

- Advertisement -

या कारणांमुळे केलं होतं दाखल 

डीहायड्रेशन, मळमळणे, उलट्या, पोटात दुखणं या कारणांसाठी ८७ कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात आणल्यानंतर एकाही रुग्णाला उलट्यांचा त्रास झालेला नाही. त्यांच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. जे आता ८ जण दाखल आहेत, त्यांना त्यांच्या पूर्ण तपासणीनंतरच कारागृहात परत पाठवण्यात येणार आहे, असं जे.जे रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुकूंद तायडे यांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच सर्व कैद्यांची चौकशी केली आहे. ८ जणांपैकी दोघांचं हिमोग्लोबिन कमी आहे. ते अॅनेमियाचे रुग्ण आहेत. त्यामुळे त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. शिवाय, काही कैदी महिलांना संसर्ग किंवा डायरिया झाला होता. त्यावेळेस त्यांना डॉक्सीसायक्लिन देण्यात आली होती. त्यामुळे कैद्यांना कोणत्याही औषधाची विषबाधा झालेली नाही, असं डॉ. औषध विभागाचे डॉ. अनिश . व्ही यांनी सांगितलं. तर, तीन गर्भवती महिला या २२ ते २४ आठवड्यांदरम्यानच्या आहेत. सध्या तिघींचीही प्रकृती स्थिर आहे. तिघींपैकी एका मातेला संडास आणि उलट्यांचा त्रास झाला होता. दोघींना फक्त उलट्यांचा त्रास झाला होता. पण, आता त्या तिघींचीही प्रकृती स्थिर आहे. त्या गर्भवती असल्याकारणाने ४८ तासांसाठी आता निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. शिवाय, एका मातेला अॅनेमिया असल्याचं तपासणीत समोर आलं आहे, असं स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विलास कुरुडे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

कारागृहाला मिळणार नोटीस ?

कारागृहातील कैद्यांना सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ४ वाजता जेवण दिलं जाते. पण, रात्रीचं जेवण त्यांना दुपारी ४ वाजता दिलं. त्यामुळे हे जेवण खराब होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय, काही कैदी महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय नित्कृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची ही तक्रार केली आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या डाळीवर किडे फिरत असल्याचं कैदी सांगतात. त्यामुळे ही विषबाधा जेवणातूनच झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेवणाचे नमुने हे एफडीएने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. जर, एफडीएने जेवणातूनच विषबाधा झाल्याचा निर्णय दिला तर, महिला आयोग पुन्हा भेट देऊन कारागृहाला याप्रकरणी नोटीस देणार असल्याचं महिला आयोगाच्या सदस्यांनी सांगितले.

एफडीएने चौकशीसाठी पाठवले ५ प्रकारचे नमुने 

एफडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील जेवणाचे नमुने चौकशी आणि तपासणीसाठी शनिवारी सकाळीच लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. त्यात भात, गव्हाचं पीठ , पोहा, सोयाबीन तेल, डाळ यांचे नमुने आहेत. त्या नमुन्यांचे रिपोर्ट लवकरच येतील, त्यानंतर विषबाधा का झाली हे उघड होईल, असं एफडीएचे सहाय्यक आयुक्त डॉ. शैलेंद्र आढाव यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -