घरताज्या घडामोडीनिवडणूक आयोग दबावाखाली आहे का? सचिन सावंत यांचा सवाल!

निवडणूक आयोग दबावाखाली आहे का? सचिन सावंत यांचा सवाल!

Subscribe

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या नियुक्तीवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सोशल मीडियाचे कंत्राट भाजपशी संबंधित कंपनीला दिले. यात भाजप आणि निवडणूक आयोगाचा संबंध काय? या काँग्रेसने विचारलेल्या प्रश्नाला निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर पूर्णपणे असमाधानाकरक असल्याचे सांगत काँग्रेसने आता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या नियुक्ती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुख्य निवडणूक अधिका-याच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्णपणे संशयास्पद असून भारत निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे का? अशी विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी  शुक्रवारी केली.

- Advertisement -

सचिन  सावंत यांनी आज निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्र जाहीर केले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती जुलै २०१९ मध्ये झाली होती. त्या अगोदर ते प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारच्या सेवेत मुंबईतील अंधेरी येथील सिप्झ येथे विशेष आर्थिक क्षेत्राचे विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांच्याविरोधात गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर ११ मे २०१८ रोजी केंद्रीय दक्षता आयोगाने वाणिज्य मंत्रालयाला त्यांच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याच गैरव्यवहाराबाबत महालेखापालांनी जून २०१८ रोजी केलेल्या लेखापरीक्षणात ताशेरे ओढले आहेत, अशी माहिती सावंत यांनी दिली.

लेखापरीक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर मांडला गेला आहे. तसेच केंद्रीय दक्षता आयोगाने दिलेले चौकशीचे आदेश आणि महालेखा परीक्षकांनी ओढलेले ताशेरे याकडे दुर्लक्ष करून राज्याचा मुख्य निवडणूक अधिकारी या अत्यंत संवेदनशील पदावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या केवळ काही महिने आधी नियुक्ती केली गेली. यातून अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतात, असे सावंत म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – धक्कादायक: उपासमारीची वेळ आल्यामुळे ST कर्मचाऱ्याने केली आत्महत्या!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -