घरताज्या घडामोडीपाणी कपात मागे घ्या; जनता दलाची मागणी

पाणी कपात मागे घ्या; जनता दलाची मागणी

Subscribe

'गेल्या काही दिवसांत झालेला चांगला पाऊस, तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि पाणी टंचाईमुळे रहिवाशांची होणारी अडचण लक्षात घेऊन शहरात लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात त्वरित मागे घेण्यात यावी', अशी मागणी जनता दल पक्षाने केली आहे.

‘गेल्या काही दिवसांत झालेला चांगला पाऊस, तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि पाणी टंचाईमुळे रहिवाशांची होणारी अडचण लक्षात घेऊन शहरात लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात त्वरित मागे घेण्यात यावी’, अशी मागणी जनता दल (से) मुंबई पक्षाने मुख्यमंत्री तसेच मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पाणी साठा दुपटीने वाढला

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नसल्यामुळे शहरात ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र, गेल्या १३-१४ दिवसांत तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाला असून पाणी साठा दुपटीने वाढून ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तसेच अजूनही पाऊस सुरूच असल्याने या आठवड्यातच पाणी साठा ९० टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्याचे दीड ते पावणे दोन महिने अजूनही बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरातील पाणी कपात मागे घ्यावी, अशी विनंती जनता दल (से) मुंबई पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी, तसेच जगदिश नलावडे, ज्योती बडेकर, अपर्णा दळवी, विद्या नाईक, संजीवकुमार सदानंद, विलास रोहिमल आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

- Advertisement -

शहरात २० टक्के पाणी कपात केल्याचे सांगितले जात असले तरी ती एकसमान नाही. अनेक वस्त्या, इमारती आणि सोसायट्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. विशेषतः पश्चिम उपनगरात ही टंचाई अधिक जाणवत आहे. बोरीवली पूर्व, मागाठाणे येथील अक्षर पत्रकार सोसायटीतच्या पाणीपुरवठ्यात ५० टक्क्यांहून अधिक कपात झाली आहे. त्यामुळे रहिवाशांना सकाळी दीड ते दोन तासही पाणी मिळत नाही. या परिसरातील अनेक सोसायट्यांना अशीच समस्या भेडसावत आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांत झालेला पाऊस, तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि पाणी टंचाईमुळे रहिवाशांची होणारी अडचण लक्षात घेऊन शहरात लागू करण्यात आलेली पाणी कपात मागे घेण्यात यावी, अशी विनंती या सर्वांनी केली आहे.

- Advertisement -

तसेच बोरीवली पूर्व, मागाठाणे येथील अक्षर पत्रकार या पत्रकारांच्या सोसायटीच्या कमी झालेल्या पाणीपुरवठ्याची वारंवार तक्रार करूनही आर मध्य विभाग कार्यालयाकडून दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे ५० टक्क्यांहून अधिक पाणी का कमी झाले, त्याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.


हेही वाचा – ‘कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -