घरमुंबईशरद पवारांना धमकी अदखलपात्र, पण चंद्रकांत पाटलांवर शाईफेक खुनाचा प्रयत्न; आव्हाडांचे ट्विट चर्चेत

शरद पवारांना धमकी अदखलपात्र, पण चंद्रकांत पाटलांवर शाईफेक खुनाचा प्रयत्न; आव्हाडांचे ट्विट चर्चेत

Subscribe

या ट्विटमुळे सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी आव्हाडांवर टीका केली आहे तर काहींनी त्यांच्या ट्विटचे समर्थन केले आहे. तुम्हीही एकाला मारहाण केली होतीत, याची आठवण एका नेटकऱ्याने करुन दिली आहे. खासदार रवी राणा यांच्या हनुमान चालीसा पठन प्रकरणाचाही मुद्दा एका नेटकऱ्याने उपस्थित केला. काहींनी या ट्विटचे समर्थन केले आहे. मात्र शिंदे- फडणवीस सरकार व त्यांच्या नेत्यांनी या ट्विटला उत्तर दिलेले नाही.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, असे ट्विट माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

या ट्विटमुळे सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी आव्हाडांवर टीका केली आहे तर काहींनी त्यांच्या ट्विटचे समर्थन केले आहे. तुम्हीही एकाला मारहाण केली होतीत, याची आठवण एका नेटकऱ्याने करुन दिली आहे. खासदार रवी राणा यांच्या हनुमान चालीसा पठन प्रकरणाचाही मुद्दा एका नेटकऱ्याने उपस्थित केला. काहींनी या ट्विटचे समर्थन केले आहे. मात्र शिंदे- फडणवीस सरकार व त्यांच्या नेत्यांनी या ट्विटला उत्तर दिलेले नाही.

- Advertisement -

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर अज्ञात व्यक्तीने फोन करून पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबई आकाराचे देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन पवार यांना ठार मारणार असल्याचे त्याने सांगितले. सिलव्हर ओक बंगल्यावर सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाने याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ याचा तपास सुरु केला. निनावी फोन करणारा मनोरुग्ण असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. कारण शरद पवार यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी आली. तरीही पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याने माजी मंत्री आव्हाड यांनी वरील ट्विट केले.

- Advertisement -

गेल्या महिन्याभरात जितेंद्र आव्हाड हे दोन घटनांमुळे चर्चेत राहिले. हर हर महादेव चित्रपटावर आक्षेप घेत आव्हाड यांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले. याप्रकरणी त्यांना अटक झाली. त्यांना जामीनही मंजूर झाला. त्यानंतर एका कार्यक्रमात आव्हाड यांनी विनयभंग केल्याची तक्रार महिलेने केली. आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. त्यावेळी आव्हाड यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे अस्वस्थ झालेल्या आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -