घरताज्या घडामोडीकर्नाटकातील पराभवानंतर भाजपचा मोठा नेता येणार महाराष्ट्र दौऱ्यावर

कर्नाटकातील पराभवानंतर भाजपचा मोठा नेता येणार महाराष्ट्र दौऱ्यावर

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमतांनी काँग्रेसचा विजय झाला. काँग्रेसचा हा विजय भाजपाला जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील सत्ता वाचवण्यासाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमतांनी काँग्रेसचा विजय झाला. काँग्रेसचा हा विजय भाजपाला जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील सत्ता वाचवण्यासाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार भाजपाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यासाठी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्ड दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. (Karnataka Assembly Election Result After Jp Nadda Mumbai Tour Maharashtra Politics)

आगामी काळात लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला मोर्चा तरुणांकडे वळवला आहे. राज्यात आधीच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावतीने युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असताना आता मुंबईतील युवकांना भाजपा साद घालणार आहे.

- Advertisement -

येत्या 18 मे रोजी युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. युवा संवाद मेळाव्यातून युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. येत्या निवडणुकीत भाजपा नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने सुरुवात केली आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते. पत्रकार आदींशी संपर्क सांधण्यास सांगितले आहे. भाजपाचे आमदार, खासदार यांना कामगार, महिला, युवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. बुधवारी (ता. 10 मे) या राज्यात विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर शनिवारी (ता. 13 मे) या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. या राज्यामध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवून ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. तर भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास पराभूत होण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोणाच्याही दबावाला विधानसभा अध्यक्ष बळी पडणार नाही; फडणवीसांचा ठाकरे गटाच्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -