घरमनोरंजन''आता तर मी फाटके कपडे घालणारच'' कटप्पाच्या लेकीची संतापजनक प्रतिक्रिया

”आता तर मी फाटके कपडे घालणारच” कटप्पाच्या लेकीची संतापजनक प्रतिक्रिया

Subscribe

तीरत सिंह रावत यांनी महिलांच्या संस्काराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे दिव्या सत्यराज ही संतापली आहे.

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांना संस्काराबाबत उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? असे रावत म्हणाले होते. महिलांच्या फाटक्या जीन्सबाबत त्यांनी केलेल्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. यातच आता दक्षिणात्या कलाकारांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. बाहुबली फेम कटप्पा अर्थात अभिनेता सत्यराज यांची मुलगी दिव्या सत्यराज हीने सुद्धा या वादात एन्ट्री घेतली आहे. दिव्याने तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर संपाजनक प्रतिक्रिया दिली आहे. आता तर मी फाटके कपडे घालणारच, तुम्हाला जे करायचंय ते करा अशा शब्दात तिने तीरथ सिंह यांना प्रतिउत्तर दिले आहे. या मुद्यावर दिव्याने तिच्या सोशल मीडियावर एक तिचा एक फोटो शेअर करत स्टेमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Sathyaraj (@divya_sathyaraj)

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Sathyaraj (@divya_sathyaraj)

 दिव्याने केलेले हे स्टेटमेंट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ‘आम्ही कोणते कपडे घालायचे, कोणते नाही, ते महिलांना शिकवू नका. मीतर फाटकी जीन्स घालणार, ‘ असे दिव्या तिच्या पोस्टमध्ये म्हणाली. तिचा राग इथेच शांत झाला नाहीतर तिने यासोबत रिप्ड जीन्समधील स्वत: चे काही फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसेच महिलांना कपड्यांवरून जज करु नका, असा संदेश तिने या फोटोंच्या माध्यमातून दिला आहे. नेते आणि राजकारणी लोक मोठमोठी स्वप्ने पाहणारे कधीही फाटक्या जीन्समधील फोटो शेअर करणार नाहीत. पण मी कोणासाठी बदलणार नाही. मी जशी आहे तशीच राहील, असेही तिने म्हटले आहे. याआधी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिनेही तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याची निंदा केली होती.

- Advertisement -

हे वाचा- ‘ओटीटी’मध्ये झालेली वाढ तात्पुरती?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -