घरताज्या घडामोडीवांगणीजवळ बिबट्याचा वावर, वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

वांगणीजवळ बिबट्याचा वावर, वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Subscribe
वांगणी परिसरात बिबट्या आढळून आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वनविभागाला दिली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या पथकाने या परिसरात पाहणी केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वांगणी पूर्वेकडील कडवपाडा हनुमान मंदिर आणि आसपास असलेल्या परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून येथे बिबट्याचा वावर होत असल्याचे स्थानिकांनी वनविभागाला सांगितले. त्यानुसार बदलापूर वनक्षेत्रफळाच्या आणि रेंजर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बदलापूर आणि परिसरात यापूर्वीदेखील बिबट्या आढळून आला आहे. सध्या ज्या ठिकाणी बिबट्या आढळला असल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली आहे. तेथूनच काही अंतरावर यापूर्वी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे हे बिबट्याचे परिक्षेत्र असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन बदलापूर वनक्षेत्रपाल प्रमोद ठाकर यांनी केले आहे.मलंगगड आणि माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या या पट्ट्यात बिबट्याचा वावर आणि त्याचे अस्तित्व यापूर्वीच वन विभागाने मान्य केले असून या बिबट्यापासून नागरिकांना कोणताही धोका नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून लहान मुलांना एकटे घराबाहेर सोडू नये तसेच जंगलात गुरे चरायला जाताना एकट्या दुकट्याने न जाता गटागटाने जावे, घरी येताना आवाज करत वा अन्य साधनांंनद्वारे आवाज करून रस्त्याने यावे असे आवाहन केले आहे. तसेच बिबट्या दिसल्यास त्याच्यावर काहीही मारण्याचा प्रयत्न करू नये अथवा त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये अशाप्रकारे वनविभागाकडून जागृती करण्यात येत आहे. वनविभागाने येथे रेंजरची गस्त देखील वाढवली आहे. मात्र बिबट्याचे अद्याप ठोस पुरावे हाती न लागल्याने त्याच्या शोधासाठी येथे वनविभाग आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -