घरमुंबईकुटुंबासह तुला मोटार अपघातात ठार करू

कुटुंबासह तुला मोटार अपघातात ठार करू

Subscribe

नवी मुंबईतील आयटी कंपनीच्या संचालकाला धमकी

 एका नामांकित आयटी कंपनीच्या संचालकांची फेसबुकच्या माध्यमातून बदनामी करून त्याला कुटुंबासह मोटार अपघातात ठार मारण्याची पत्राद्वारे धमकीदिल्या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकी सत्रामुळे संचालकासह संपूर्ण कुटुंब दहशतीखाली असून धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, या बाबत काहीही कळू शकले नाही.

पवईतील हिरानंदानी संकुल या ठिकाणी कुटुंबासह राहणारे पंकज जयस्वाल हे नवी मुंबईतील एका नामांकित आय टी कंपनीचे संचालक आहेत. जयस्वाल यांच्या कंपनीच्या आवारात उभी असलेल्या मोटारीचा फोटो त्यांना इमेल करून आणि ‘मै तुम्हारी सब डिटेल सबको बता दुँगा’ अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिली. त्यानंतर तक्रारदार जयस्वाल यांच्या नावाचे फेसबुकवर बनावट खाते उघडून त्यामार्फत त्यांची बदनामी करण्यात आली.

- Advertisement -

जयस्वाल यांनी या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले असता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना त्यांच्या घराच्या पत्यावर दोन पत्रे आली. त्यामध्ये त्यांची बदनामी करून आयुष्यातून उठवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकारामुळे जयस्वाल कुटुंब पूर्णपणे घाबरलेले असताना ३० ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरी आणखी एक पत्र आले. त्या पत्रात धमकी देणार्‍याने कहरच केला, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मोटार अपघातात ठार करण्याचा धमकी पत्राच्या माध्यमातून दिली . या धमकीमुळे संपूर्ण कुटुंब हादरले असून अखेर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात इसमाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली . या प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी आमच्याकडे तक्रार आलेली आहे. मात्र धमकी देणारी व्यक्तीचा या मागचा हेतू स्पष्ट झालेला नाही. तसेच जयस्वाल यांचा कुणासोबतही वाद नसल्यामुळे धमकी देणार्‍या व्यक्तीला अटक केल्यानंतरच या धमकीमागचे कारण कळू शकेल . पवई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकर गुन्ह्याचा उलगडा करण्यात येईल.
अनिल पोफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पवई पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -