घरमुंबईLok Sabha 2024 : देशात कमळ फुलताच जितेंद्र आव्हाडांकडून मॅच फिक्सिंग म्हणत...

Lok Sabha 2024 : देशात कमळ फुलताच जितेंद्र आव्हाडांकडून मॅच फिक्सिंग म्हणत सडकून टीका

Subscribe

गुजरातच्या सुरतमध्ये भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत, याचपार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा पहिलाच टप्पा पार पडला आहे. तर देशातील एकूण सात टप्प्यांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. पण त्यापूर्वीच गुजरात आणि देशात भाजपाचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. याचपार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मॅच फिक्सिंगचा आरोप करत भाजपावर ट्विटरच्या माध्यमातून सडकून टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024 surat Mukesh Dalal wins Jitendra Awhad criticizes BJP as match fixing)

लोकशाही कशी धोक्यात आहे याची क्रोनोलॉजी समजून घ्या, असे म्हणत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुरतमध्ये काँग्रेसचे पहिले उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर सुरतमधून काँग्रेसच्या दुसऱ्या पर्यायी उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर भाजपा उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले (की मागे घेण्यास भाग पाडले गेलं?) आणि मग सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांना ‘बिनविरोध’ विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक आयोग वारंवार सांगतो की, सर्वांना समान संधी आणि न्याय मिळाला पाहिजे, परंतु तेदेखील सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले झाले आहेत. अन्यथा ही परिस्थिती उद्भवली नसती, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – NCP Manifesto : शरद पवारांच्या गुरूबाबत अजितदादांकडून जाहीरनाम्यात मोठं आश्वासन

- Advertisement -

मोदींकडून मॅच फिक्सिंग (Match fixing by Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मॅच फिक्सिंग’ करत आहेत, कारण सध्या ते बिथरले आहेत. दहा वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही त्यांच्याकडे मतदारांना सांगण्यासारखे काही नाही. भाजपाच्या उमेदवारांचे तर काहीच कर्तृत्व नाही. मोदींकडे निवडणूक सभांमध्ये बोलण्यासाठी काही नाही म्हणून ते हिंदू-मुसलमान या मुद्याकडे वळले आहेत. उमेदवारी भरण्याच्या पातळीवरच सर्व यंत्रणा मॅनेज करूनच ही लोकं ‘400 पार’चा नारा देत आहेत. म्हणून आम्ही वारंवार सांगतोय ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : येत्या निवडणुकीत विरोधकांच्या लंकेचे दहन करा; मुख्यमंत्र्यांचे मतदारांना आवाहन 

मुकेश दलाल विजयी (Mukesh Dalal wins)

गुजरातच्या सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला तर, उर्वरित आठ उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पाठिंबा देत अर्ज मागे घेतले. त्यानंतर भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. मुकेश दलाल हे सुरतच्या इतिहासातील बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार ठरले आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी या विजयाबद्दल मुकेश दलाल यांचे अभिनंदन केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही ट्विटररून मुकेश दलाल यांचे अभिनंदन केले. आता गुजरातमधील 25 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज बाद ठरवल्याबद्दल काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -