घरताज्या घडामोडीBurning Train : मुंबईच्या दिशेने येणाऱ्या होळी स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला आग

Burning Train : मुंबईच्या दिशेने येणाऱ्या होळी स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला आग

Subscribe

मागील काही दिवसांपासून सातत्याने ट्रेनच्या बोगीला आग लागल्याच्या घटना घडत आहेत. गोदान एक्स्प्रेसच्या बोगीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच दानापूरहून मुंबईच्या येणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनर्सच्या स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई : मागील काही दिवसांपासून सातत्याने ट्रेनच्या बोगीला आग लागल्याच्या घटना घडत आहेत. गोदान एक्स्प्रेसच्या बोगीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच दानापूरहून मुंबईच्या येणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनर्सच्या स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. होळीसाठी गावी गेलेल प्रवासी पुन्हा मुंबईत परतत असताना ही घटना घडली. या आगीची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. (lokmanya tilak special 01410 train fire broke out in ac bogie patna bihar)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकमान्य टिळक स्पेशल 01410 या ट्रेनच्या एसी बोगीला आग लागली. ही ट्रेन आरा इथल्या कारीसाथ भागात थांबली असताना ही घटना घडली. या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. परंतू, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे होळीमुळे ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. त्यामुळे एसी बोगीला लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ट्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसाना झाले आहे.

- Advertisement -

या ट्रेनला लागलेल्या आगीमुळे या मार्गावर इतर ट्रेनवर त्याचा परिणाम झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं असून प्रवाशांचे हाल झाले. या मार्गावरुन येणाऱ्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय, या घटनेमुळे डाउन लाइनवरील वाहतूक काही काळासाठी निलंबित करण्यात आली आहे.

दरम्यान, एसी बोगीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, दानापूर इथला हेल्पलाइन नंबर -06115232401 तर आरा इथला हेल्पलाइन नंबर 9341505981 आणि बक्सर हेल्पलाइन नंबर – 9341505972 रेल्वेकडून जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – THACKERAY GROUP : ‘चारशे पार’चा मुजरा आणि ‘पुन्हा येईन’चा गजरा; उद्धव गटाची भाजपवर सडकून टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -