घरताज्या घडामोडीLost Child Found : बेपत्ता मुलगा QR code मुळे सापडला; मुंबईच्या वरळीतील...

Lost Child Found : बेपत्ता मुलगा QR code मुळे सापडला; मुंबईच्या वरळीतील घटना, वाचा सविस्तर

Subscribe

वरळी येथील 12 वर्षांचा बौद्धिकदृष्ट्या अपंग मुलगा गुरुवारी बेपत्ता झाला होता. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पालकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. परंतू, बेपत्ता मुलगा त्याच दिवशी रात्री 8:20 वाजताच्या सुमारास कुलाबा परिसरात एका बस कंटक्टरला सापडला.

मुंबई : मागील काही दिवसांपासून लहान मुलं बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीच्या ठिकाणांवरून बेपत्ता होणाऱ्या मुलांची संख्या अधिक असते. पण बेपत्ता झाल्यावर मुलांचा तपास करणे कठीण जाते. अशावेळी काही मुलं सापडतात तर, काही मुलं अपंग असल्याने त्यांचा शोध घेणे कठीण जाते. पण या मुलांच्या शरीरावरील निशाणी अथवा गळ्यातील लॉकेट किंवा खिशात काही सापडल्यास तपास सोपा होतो. अशीच काहीशी घटना मुंबईत घडली आहे. मुंबईच्या वरळी परिसरात राहणारा मुलगा त्याच्या गळ्यातील लॉकेटमुळे कुलाब्यात सापडला. (Lost Child Found Missing child found by QR code The incident in Mumbai Worli)

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी येथील 12 वर्षांचा बौद्धिकदृष्ट्या अपंग मुलगा गुरुवारी बेपत्ता झाला होता. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पालकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. परंतू, बेपत्ता मुलगा त्याच दिवशी रात्री 8:20 वाजताच्या सुमारास कुलाबा परिसरात एका बस कंटक्टरला सापडला. त्यावेळी त्या बस कंटक्टरने पोलिसांना फोन केला आणि एक मुलगा, जो पालकांबरोबर नाही, तो डॉ. शामा प्रसाद मुखर्जी चौकाजवळ सापडला, असे सांगितले. त्यानंतर तातडीने पोलिसांची एक टीम तिकडे गेली आणि त्या मुलाला ताब्यात घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – BMC : मुंबईतील 10 हजार महिला बचतगटांची उत्पादने आता मोबाइल ॲपवर

परंतू, मुलगा अपंग असल्याने बोलू शकत नव्हता. पोलिसांनी त्या मुलाला नाव आणि पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. पण मुलगा काहीच बोलत नव्हता. त्यामुळे मुलाचा तपास लावणं कठीण जात होते. त्याचवेळी पोलिसांनी त्या मुलाच्या गळ्यात एक लॉकेट दिसले. हे लॉकेट सोने-चांदीचे नसून एका QR code चे होते. विशिष्ट QR code त्या लॉकेटमध्ये होता. पोलिसांनी तो QR code स्कॅन केला. त्यावेळी पोलिसांना projectchetna.in नावाच्या एनजीओची माहिती मिळाली.

- Advertisement -

या एनजीओच्या QR code मुळे पोलिसांना त्या मुलाचा पत्ता त्याचे नाव आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलचे इतर तपशील मिळाले. विशेष म्हणजे त्यामध्ये मुलाच्या पालकांचा फोन नंबरही होता. त्यानंतर कुलाबा पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. अखेर दुपारी हरवलेल्या मुलाला रात्री आठ वाजताच्या सुमारास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

projectchetna.in हे एनजीओ काय काम करते?

मिळालेल्या माहितीनुसार, projectchetna.in ही एक नोंदणीकृत एनजीओ आहे. विशेष दिव्यांग मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळांशी ही एनजीओ संपर्क ठेवते. तसेच, त्या मुलांना QR code असणारे पेंडेंट पुरवते. या QR code असणाऱ्या लॉकेटमध्ये संबंधित मुलांचा संपूर्ण तपशील असतो. हे एनजीओ सप्टेंबर 2023 मध्ये सुरू झाले आहे. या एनजीओने आत्तापर्यंत 5,500 पेक्षा जास्त पेंडेंट विशेष दिव्यांग आणि वृद्ध लोकांना वितरीत केले आहेत.


हेही वाचा – MUMBAI LOCAL TRAINS : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मेगाब्लॉक नको; शिवसेनेची रेल्वेकडे मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -