महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा

राज्यात लोकसभा निवडणुकीचं वारे वाहू लागले आहे. या निवडणुकांना अद्याप वर्षभराचा कालावधी असला तरी, सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. युती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित आहेत. तर ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीसोबतही युती केली आहे. यामुळे जागांचे वाटप कसं होणार? काय फॉर्म्युला असेल? याबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यता येत आहेत.