घरमुंबईमराठा क्रांती मोर्चाचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला; शिवसेनेचे मानले आभार

मराठा क्रांती मोर्चाचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला; शिवसेनेचे मानले आभार

Subscribe

मराठा आरक्षणासाठी दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानण्यासाठी मराठा क्रांती मोर्च्याच्या नेत्यांनी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

मराठा आरक्षण कोर्टाने वैध ठरवल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते, वकील आणि समन्वयक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत आभार मानण्यासाठी त्यांनी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या लढ्याला दिलेल्या पाठिंबाबद्दल त्यांनी शिवसेनेचे आभार मानले आहे.

ShivSena ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಜೂನ್ 29, 2019

- Advertisement -

मराठा समजाच्या आरक्षणाच्या लढाई दरम्यान शिवसेना पक्ष मराठा समाजासोबत होता. मराठा समाजाच्या ४० वर्षाच्या लढाईला अखेर यश आले आहे. आज आम्हाला आरक्षण मिळाले हे शिवसेनेमुळे शक्य झाले त्यामुळे आभार मानन्यासाठी आम्ही उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी आलो आहोत. सर्वांच्या पाठिंब्यामुळे आज आमचा लढा यशस्वी झाला. यापुढे देखील सहकार्य केले तर दिल्लीमध्ये देखील लढाई जिंकू असे मत समन्वयकांनी व्यक्त केले.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे मला देखील आनंद झाला असल्याचे मत उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. शिवसैनिक आणि मराठा समाजाच्या भगवा हातता नाही तर हृदयात आहे. महाराष्ट्रात जन्मला येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर, प्रेम घेऊनच जन्माला आलो आहोत. श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काहीच केले नाही. ही मोठी लढाई असून दिल्लीमध्ये सुध्दा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

तसंच, उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या एकीचे अभिनंदन केले आहे. मराठा आणि मराठा इतर वाद न करता शिवरायाचे मावळे म्हणून एकत्र आलो तर ही ताकद जगात दाखवता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले. अत्यंत स्पष्टपणाने कोणाचा हक्क काढून न घेता मराठा समाजाला त्यांचा हक्क दिला असेल तर त्याच्या आड कोणीच येऊ नये असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ही एकजूट आता कायम राहु द्या ती तुटू देऊ नका. तसंच मराठा समाजाच्या आंदोलनावेळी जे गुन्हे दाखल केले होते ते टप्प्या टप्प्याने मागे घेण्यात आले आहेत. कोणावरही अन्याय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -