घरमुंबईविधानसभेसाठी भाजपाचा मास्टर प्लॅन, विरोधी पक्षासाठी टाकणार गुगली

विधानसभेसाठी भाजपाचा मास्टर प्लॅन, विरोधी पक्षासाठी टाकणार गुगली

Subscribe

लोकसभा निवडणुकित जसे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघात निवडणूक काळात व्यस्त ठेवण्यात भाजपाला यश आले होते. तशीच खेळी आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील खेळली जाणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अब की बार २२० के पार ची घोषणा दिलेल्या भाजपा-शिवसेना युतीने या निवडणुकीसाठी एक मास्टर प्लॅन आखला आहे. जो प्लॅन लोकसभा निवडणुकीत राज्यात वापरण्यात आला तोच प्लॅन आता विधानसभा निवडणुकीत देखील भाजपा वापरणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा निवडणुकित जसे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघात निवडणूक काळात व्यस्त ठेवण्यात भाजपाला यश आले होते. तशीच खेळी आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील खेळली जाणार असल्याची माहित एका नेत्याने ‘आपलं महानगर’शी खासगीत बोलताना दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्टार नेत्यांसमोर उभं करणार आव्हान 

लोकसभा निवडणुकीत बारामती, नांदेडमध्ये तोडीस तोड उमेदवार देऊन भाजपाने शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना त्यांच्याच मतदारसंघात लक्ष ठेवण्यास भाग पाडले होते, हाच प्लॅन विधानसभा निवडणुकीत देखील आखला जाणार आहे. अजित पवार यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याचा भाजपा विचार करत असून यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे बारकाईन लक्ष देत आहेत. तसेच यावेळी बारामती जिंकू असा निर्धार देखील भाजपाने केला आहे. एवढच नाही तर अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण या भोकर मतदारसंघात आमदार आहेत. त्या मतदारसंघात देखील शिवसेना-भाजपाकडून तगडा उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. एवढंच नाही तर छगन भुजबळ, जयंत पाटील यांना देखील त्यांच्यात मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा प्लॅन भाजपा आखत आहे.

- Advertisement -

यांना देणार शिवसेना-भाजपा आव्हान 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची ओळख असलेल्या लातूर मतदारसंघात देखील भाजपा अमित देशमुख यांना आव्हान उभे करणार असल्याची माहिती मिळत आहे.

म्हणून पुन्हा तोच आखाणार प्लॅन 

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण यांच्यासमोर तोडीसतोड उमेदवार दिल्यामुळे या नेत्यांना त्यांचा मतदारसंघ सोडून राज्यातील इतर मतदारसंघात प्रचार करायला वेळच मिळाला नाही आणि हेच भाजपा-शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचे पहायला मिळाले. हीच स्ट्रेटेजी विधानसभा निवडणुकीत वापरली तर आपले २२० के पार चे स्वप्न पूर्ण होऊ शकतं, असा विश्वास एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितला. त्यामुळे लोकसभेचा मास्टर प्लॅन विधानसभेत कितपत भाजपा-शिवसेनेच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -