घरमुंबईम्हाडाची खुशखबर! अल्प उत्पन्न गटासाठी १००० घरांची लॉटरी!

म्हाडाची खुशखबर! अल्प उत्पन्न गटासाठी १००० घरांची लॉटरी!

Subscribe

म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात शनिवारी सकाळी १० वाजता मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रकाश मेहता यांनी नव्या लॉटरीची घोषणा केली. सुमारे ९०० ते १००० घरांसाठी ही सोडत निघणार असून येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये ही सोडत जाहीर केली जाईल असंही मेहता यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीची सोडत शनिवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे शेकडो अर्जदारांना दिलासा मिळाला असला, तरी ज्यांना घर नाही लागले, अशा अर्जदारांची निराशा झाली आहे. यावेळी सोडत जाहीर करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता देखील उपस्थित होते. यंदा घरं न लागलेल्या अर्जदारांची जरी निराशा झाली असली, तरी त्यांच्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी एक मोठी खुशखबर दिल आहे. म्हाडाच्या नव्या घरांच्या लॉटरीची घोषणा यावेळी प्रकाश मेहता यांनी केली आहे. त्यामुळे या अर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

अल्प उत्पन्न गटासाठी नवी घरं!

म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात शनिवारी सकाळी १० वाजता मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रकाश मेहता यांनी नव्या लॉटरीची घोषणा केली. सुमारे ९०० ते १००० घरांसाठी ही सोडत निघणार असून येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये ही सोडत जाहीर केली जाईल असंही मेहता यांनी यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे या घरांपैकी बहुतांश घरं ही अल्प उत्पन्न गटातल्या अर्जदारांसाठी असतील, असं मेहता यांनी यावेळी जाहीर केलं.

- Advertisement -

काय केली घोषणा?

येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार सोडत जाहीर
९०० ते १००० घरांसाठी होणार सोडत
एकूण घरांच्या ९०% घरं अल्प उत्पन्न गटासाठी राखीव
लवकरच ठिकाणांची होणार घोषणा
घरांसाठी ५६ वसाहती आराखड्यांना मिळणार मंजुरी


सोडतीचा व्हिडिओ पाहाण्यासाठी इथे क्लिक करा:

- Advertisement -

http://mhada.ucast.in


अल्प प्रतिसादावर व्यक्त केली चिंता

दरम्यान, कोकण मंडळाच्या शनिवारी निघालेल्या सोडतीविषयी प्रकाश मेहता यांनी चिंता व्यक्त केली. तब्बल ९ हजार १८ घरांसाठी यंदा फक्त ५५ हजार अर्ज आले. त्यामुळे यंदा अर्जदारांनी प्रतिसाद कमी का दिला? याचा आढावा घेणार असल्याचंही यावेळी प्रकाश मेहता म्हणाले. तसेच, ऑक्टोबरमध्ये निघणाऱ्या लॉटरीमध्ये असा प्रकार घडू नये, यासाठी विशेष काळजी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -