घरमुंबईमोनोरेल तब्बल ९ तास ठप्प; विजेच्या तांत्रिक बिघाडाचा फटका!

मोनोरेल तब्बल ९ तास ठप्प; विजेच्या तांत्रिक बिघाडाचा फटका!

Subscribe

मोनोरेलची सेवा सलग ९ तास ठप्प होण्याचा प्रकार आज, सोमवारी घडला. मोनोरेलला होणाऱ्या वीज पुरवठा यंत्रणेत वाशीनाका परिसरात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर मोनोरेल आज दिवसभरात ९ तास बंद होती. सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास बंद पडलेली मोनोरेलची सेवा पूर्ववत होण्यासाठी रात्रीचे ७.१५ वाजले. त्यामुळे दिवसभर मोनोरेल प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

बिघाडाच्या घटनेनंतर मोनोरेलमध्ये अडकलेल्या ३८ प्रवाशांना काही वेळानंतर दुसऱ्या मोनोरेलच्या माध्यमातून शिफ्ट करण्यात आले. तसेच ही मोनोरेल टो करून यार्डमध्ये नेण्यात आली. पण संपूर्ण वीज पुरवठ्याच्या यंत्रणेत झालेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी मात्र तब्बल ९ तासांचा कालावधी लागला. मोनोरेलकडून दोनवेळा मोनोरेल सुरू होण्याची माहिती देण्यात आली होती. दुपारी १ वाजता त्यानंतर दुपारी ३.३० वाजेपर्यंत मोनोरेलची सेवा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मोनोरेलचा महाल्क्ष्मी ते वडाळा रोड दरम्यानचा टप्पा हा सुरू करण्यात आला. रात्री ८ वाजता वाशीनाका परिसरातील विजेच्या बिघाडाची दुरूस्ती पूर्ण होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती मोनोरेल प्रशासनाकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -