घरमुंबईअहमदाबाद-मुंबई पहिल्या खासगी तेजसचा मुहूर्त मकर संक्रांतीला

अहमदाबाद-मुंबई पहिल्या खासगी तेजसचा मुहूर्त मकर संक्रांतीला

Subscribe

देशातील पहिली खासगी ट्रेन दिल्ली ते लखनऊ दरम्यान चालविल्यानंतर आता मुंबई- अहमदाबाद ही दुसरी तेजस एक्सप्रेस लवकरच धावणार आहे.नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून ही ट्रेन चालविण्यात येणार होती. परंतु, आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे.गुजरात राज्यात होणारा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव व डोळ्यांसमोर ठेवून ही ट्रेन १४ जानेवारीच्या आसपास चालविण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्स्प्रेसचा प्रवास लवकरच करता येणार आहे.

भारतीय रेल्वेने आपल्या सेवेचा चेहरा बदलण्यास सुरुवात केलेली आहे. यानुसार दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस आणि मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस या रेल्वेला खासगी स्वरूपात चालवण्यात येत आहे. या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था आहेत. पहिली खासगी ट्रेन दिल्ली ते लखनऊ मार्गावर धावत आहे.तर दुसरी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान नोव्हेंबर महिन्यात धावणार होती.परंतु, आता या ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. मकर संक्रात जानेवारी महिन्याच्या १४ तारखेला साजरी केली जाते.त्यानिमित्त गुजरात राज्यात आंतराष्ट्रीय पतंग महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. या महोत्सवाकरिता देशातील आणि परदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.हीच गर्दी कॅश करण्यासाठी मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस १४ जानेवारीच्या जवळपास चालविण्याचा आयआरसीटीसीचा विचार सुरू आहे.त्यादिशेने काम देखील सुरू आहे.

- Advertisement -

असे असणार तेजसचे वेळापत्रक

मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी तेजस एक्सप्रेस फक्त सुरत आणि वडोदरा स्थानकात थांबा घेणार आहे. सकाळी ६ वाजून १०मिनिटांनी सुटणार असून मुंबईला दुपारी १ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीकरिता दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी सुटलेली तेजस एक्सप्रेस अहमदाबादला रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचणार आहे. या एक्सप्रेसला १० चेअर कार आणि २ एक्झिक्युटिव्ह कोच असणार आहेत. आठवड्यातील गुरुवार वगळता ही एक्सप्रेस दररोज धावणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -