घरमुंबईएमजीएमची कॉम्प्युटर सिस्टीम हॅक; बिटकॉईनद्वारे खंडणीची मागणी

एमजीएमची कॉम्प्युटर सिस्टीम हॅक; बिटकॉईनद्वारे खंडणीची मागणी

Subscribe

बिटकॉइनच्या नावाखाली पैसे उकळण्यासाठी वाशीतील एम जी एम रुग्णालयाची सिस्टीमच हॅक करण्यात आली असल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला आहे.

बिटकॉइनच्या नावाखाली पैसे उकळण्यासाठी वाशीतील एम जी एम रुग्णालयाची सिस्टीमच हॅक करण्यात आली असल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला आहे.याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर हल्ला करणार्‍या भामट्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तुषार दोषी यांनी दिली.

गतवर्षी जेएनपीटीला रॅन्समवेअर व्हायरसचा फटका बसल्यानंतर आता वाशीतील एमजीएम रुग्णालयाच्या कॉम्प्युटर सिस्टिमवर व्हायरसचा हल्ला झाला आहे. रविवारी एमजीएम हॉस्पीटलचे कामकाज सुरू असताना रात्री ११ च्या सुमारास अचानक सिस्टीम हॅक झाली. अचानक रुग्णालयांच्या सर्वच संगणकांमध्ये व्हायरस आल्याने रुग्णालयाची यंत्रणाच कोलमडली.

- Advertisement -

त्याचवेळी सिस्टीम पूर्ववत करण्यासाठी बिटकॉइनद्वारे पेमेंट केल्यास सिस्टीम पूर्ववत करण्यात येईल, असा मेल रुग्णालय प्रशासनाला आल्याने रुग्णालयाची सिस्टीम हॅक झाल्याची कल्पना रुग्णालय प्रशासनाला आली. त्यावेळी रुग्णालयातील रामनाथ परमेश्वरम यांनी याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाची शहनिशा करत गुन्हा दाखल केला. यापूर्वी गतवर्षी जून महिन्यात जेएनपीटीला रॅन्समवेअर व्हायरसचा फटका बसला होता. रॅन्समवेअरनंतर ता पेट्या रॅन्समवेअर व्हायरस जगभरातील देशांना डोकेदुखी ठरत आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. बिटकॉइनच्या माध्यमातून रुग्णालयाला टार्गेट करण्यात येत आहे. सायबर सेलकडून पास सुरू असून लवकरच या मागचा सूत्रधार समोर येईल. -तुषार दोषी, उपायुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय

- Advertisement -

रविवारी रात्री ११ च्या सुमारास रुग्णालयाची सिस्टीम हॅक झाली. त्यानंतर तत्काळ संगणक तज्ज्ञ बोलवण्यात आले. त्या नंतर लॉस झालेला डाटा मिळवायला सुरुवात करण्यात आली. बहुतांश डाटा घेण्यात आला असून लवकरच सर्व डाटा मिळून जाईल, त्यामुळे कोणताही धोका नाही.  -एस.पी.शशांकर ,संचालक, एमजीएम हॉस्पीटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -