घरमुंबईकारशेड आरे कॉलनीतच होणार; याचिका कोर्टाने फेटाळली

कारशेड आरे कॉलनीतच होणार; याचिका कोर्टाने फेटाळली

Subscribe

पर्यावरणप्रेमींचा विरोध झुगारून मुंबई हायकोर्टाने ‘आरे’मधील मेट्रो कारशेड विरोधाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार आहे.

आरे कॉलनीतील मेट्रो -३ कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. कारशेड विरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. पर्यावरणप्रेमींचा विरोध झुगारून मुंबई हायकोर्टाने ‘आरे’मधील मेट्रो कारशेड विरोधाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार आहे. मेट्रोच्या कारशेडमुळे आरे कॉलनीतील झाडे तोडली जाणार होती. त्यामुळे वृक्षतोडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. मेट्रो -३ च्या कारशेडबाबतचा शेवटा निर्णय आज कोर्टाने जाहीर केला त्यामुळे मेट्रो- ३ चे कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार आहे.

३१३० झाडांची होणार कत्तल

कुलाबा ते सीप्झ मेट्रो – ३च्या प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये कारशेड बनवण्यात येणार आहे. या कारशेडसाठी दिल्लीतील सॅम बिल्टवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कॉन्ट्रक्ट देण्यात आले आहे. आरे कॉलनीमध्ये तयार करण्यात येणाऱ्या या कारशेडसाठी ३२८ कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. आरे कॉलनीमधील २५ हेक्टर जमिनीवर हे कारशेड असणार असून या कारशेडसाठी ३१३० झाडांची कत्तल केली जाणार आहे.

- Advertisement -

कारशेडमध्ये केले जाणार हे काम

आरे कॉलनीतील मेट्रो -३ च्या कारशेडमध्ये मेट्रो गाड्या पार्क केल्या जाणार आहेत. मेट्रो गाड्या त्याठिकाणी धुतल्या जाणार आहेत. तसंच मेट्रो गाड्यांची दुरुस्तीचे काम देखील या कारशेडमध्ये होणार आहे. आरो कॉलनीमध्ये मेट्रो ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येणआर आहे. तसंच प्रशासकीय विभाग देखील असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -