पुढच्या वर्षापासून मेट्रो-३ मुंबईकरांच्या सेवेत, अश्विनी भिडे यांची माहिती

मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असेलेला मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा प्रवास पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 प्रकल्पाच्या आरे कारशेडचे काम जुलै 2023 मध्ये पूर्ण होणार आहे.

ashwini bhide ias officer

मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असेलेला मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा प्रवास पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 प्रकल्पाच्या आरे कारशेडचे काम जुलै 2023 मध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर 33.5 किलोमीटर मार्गिकेतील सीप्झ ते बीकेसी हा टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली. (mumbai metro 3 line Service next year aarey carshed work completed in July 2023)

‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत मेट्रो-3 या प्रकल्पाची सध्यस्थितीची माहिती दिली. तसेच, त्यांनी प्रकल्पाच्या खर्चाबाबत माहिती देत मेट्रो 3 मार्गिकेच्या कामाला 2016 मध्ये सुरूवात झाली होती. या भुयारी मेट्रो मार्गाचे काम करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे प्रकल्पास विलंब झाला आणि 2021 मध्ये मेट्रो सुरू करण्याचा मुहूर्त चुकला, असे भिडे यांनी सांगितले.

“मागील अनेक काळापासून मेट्रो 3 प्रकल्पातील कारशेडचा वाद सुरू होता. मात्र, आता आरे कारशेडच्या कामावरील स्थगिती उठविण्यात आल्याने ‘एमएमआरसी’ने वेगाने कामास सुरूवात केली आहे. आतापर्यंत कारशेडचे 29 टक्के काम झाले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कारशेडचे काम एप्रिल 2023 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील काम जुलै 2023 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या कामाला 2023 च्या जुलै-ऑगस्ट दरम्यान सुरूवात होणार आहे. तसेच, सुरक्षा चाचणी पूर्ण करून डिसेंबर 2023 पासून सीप्झ ते बीकेसी भुयारी मेट्रो मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल”, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

मेट्रो 3 मार्गिकेतील पहिली गाडी मरोळ-मरोशीतील तात्पुरत्या कारशेडमध्ये गेल्या आठवड्यात दाखल झाली आहे. या गाडीची यशस्वी जोडणी करण्यात आली आहे. आता पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, ऑगस्टअखेरीस मेट्रो गाडीची चाचणी करण्यात येणार असल्याचे भिडे यांनी सांगितले. मेट्रो ३ मार्गिकेच्या कारशेडचे काम रखडल्याने खर्चात 10 हजार 270 कोटींची वाढ झाली आहे, असेही भिडे यांनी सांगितले.


हेही वाचा – दोन दिवसात खातेवाटप होईल, तर सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत निवडणुका; सुधीर मुनगंटीवारांचे मोठे वक्तव्य