घरमुंबईप्राध्यापक संपावर, परीक्षा गॅसवर

प्राध्यापक संपावर, परीक्षा गॅसवर

Subscribe

संपामुळे महाविद्यालयांना ९० दिवसांचा ठरवून दिलेला पोर्शनही अपुरा राहिला आहे. यामुळे महाविद्यालयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एकीकडे प्राध्यापकांचा संप आणि पोर्शनची ओरड तर दुसरीकडे तोंडावर आलेल्या परीक्षा यामुळे विद्यापीठाची परीक्षाच गॅसवर आली आहे. या दुहेरी संकटातून मार्ग काढण्यासाठी विद्यापीठाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. प्राध्यापकांच्या या मागण्यांसाठी संघटनांची सरकारबरोबर वाटाघाटी सुरू आहेत. अद्याप त्यांना यश आलेले नाही. आंदोलन सुरुच असल्याने मुंबई विद्यापीठ प्रशासन पेचात सापडले आहे. हे आंदोलन सुरुच राहिले तर आगामी चार ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या हिवाळी परीक्षा कशा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या संपामुळे महाविद्यालयांना ९० दिवसांचा ठरवून दिलेला पोर्शनही अपुरा राहिला आहे. यामुळे महाविद्यालयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एकीकडे प्राध्यापकांचा संप आणि पोर्शनची ओरड तर दुसरीकडे तोंडावर आलेल्या परीक्षा यामुळे विद्यापीठाची परीक्षाच गॅसवर आली आहे. या दुहेरी संकटातून मार्ग काढण्यासाठी विद्यापीठाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘एमफुक्टो’ या संघटनेने सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. प्राध्यापकांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीदेखील विशेष बैठक बोलवत या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षणमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारचे ठोस लेखी आश्वासन न दिल्याने हे कामबंद आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय ‘एमफुक्टो’ या संघटनेने घेतल्याने राज्यात अनेक ठिकाणी कामबंद आंदोलन सुरूच आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांनी संपात सहभाग घेतला असून यात बुक्टो प्रभावित कोकणातल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने गुरुवारीही अनेक कॉलेजांमध्ये बंद पाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने आता विद्यापीठ प्रशासनाची झोप उडविली आहे. कारण आगामी काही दिवसांवर विद्यापीठाची परीक्षा आली आहे. या परीक्षेचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या परीक्षांचा पहिला टप्पा ४ ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्या तब्बल तीन महिने चालणार आहेत. परीक्षा सुरु होण्यास केवळ सहा दिवस आठवडा राहिला असताना प्राध्यापक आंदोलनावर ठाम आहेत. संपामुळे महाविद्यालयांना देण्यात आलेला पोर्शनही अपुरा आहे. त्यातच परीक्षा असल्यामुळे विद्यापीठात एकूणच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

बायोमेट्रिक हजेरी तपासणार

शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनात अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले असले तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन न दिल्याने प्राध्यापकांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. त्यामुळे सरकारने देखील याची गंभीर दखल घेतली आहे. यामुळे शुक्रवारपासून मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांची बायोमेट्रिक हजेरी तपासली जाणार असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागातील एका उच्च अधिकार्‍याने दिली आहे.

- Advertisement -

कसा बसणार परीक्षेला फटका

या प्राध्यापक संघटनांतील बहुतांश प्राध्यापक हे अनुदानित तत्त्वावर काम करीत आहेत. यात प्रामुख्याने वरिष्ठ प्राध्यापक हे अनेक कॉलेजांमध्ये परीक्षा व्यवस्थापनाचे काम पाहतात. तर अनेक प्राध्यापक पर्यवेक्षकांची भूमिका बजावित असल्याने या कामबंद आंदोलनाचा फटका थेट परीक्षा व्यवस्थेला बसणार आहे.

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यायला हवं

प्राध्यापकांच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याच्या प्रकारावर मुक्ता या प्राध्यापक संघटनेच्या मुंबई अध्यक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. १५ ते २० वर्षांपासून प्राध्यापकांकडून आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे प्राध्यापकांची प्रतिमा धुळीस मिळत चालली आहे. याचा फटका प्राध्यापकांनाच बसणार असल्याने या आंदोलनात सहभागी होऊ नका, असे आवाहन आम्ही केले आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता परीक्षा प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही हे आवाहन केले आहे.
– वैभव नलावडे, अध्यक्ष, मुक्ता प्राध्यापक संघटना.

एकूण ६६१ अभ्यासक्रमांच्या परीक्षा

४ ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या विद्यापीठाची हिवाळी सत्र परीक्षा तब्बल डिसेंबरपर्यंत सुरु राहणार असून यावेळी विविध ६६१ अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात पुर्नपरीक्षा(रिपिटर्स) घेण्यात येणार असून त्यानंतर पदवी आणि पदवुत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्यात येणार आहे. तर अंतिम टप्प्यात इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

कसा बसणार परीक्षेला फटका

या प्राध्यापक संघटनांतील बहुतांश प्राध्यापक हे अनुदानित तत्त्वावर काम करीत आहेत. यात प्रामुख्याने वरिष्ठ प्राध्यापक हे अनेक कॉलेजांमध्ये परीक्षा व्यवस्थापनाचे काम पाहत आहेत. तर अनेक प्राध्यापक पर्यवेक्षकांची भूमिका बजावित असल्याने या कामबंद आंदोलनाचा फटका थेट परीक्षा व्यवस्थेवर बसणार आहे.

विद्यापीठांच्या एकूण परीक्षा

सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी 318
कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट 118
ह्युमॅनिटीज ७७
इंटरडिसीप्लिनरी १४८
एकूण परीक्षा ६६१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -