घरमुंबईवर्सोवा गॅस सिलिंडर स्फोटप्रकरणी महापौरांचे चौकशीचे आदेश

वर्सोवा गॅस सिलिंडर स्फोटप्रकरणी महापौरांचे चौकशीचे आदेश

Subscribe

या आगीत ४ जण जखमी, स्फोटाने परिसर हादरला

वर्सोवा येथे बुधवारी सकाळच्या सुमारास एलपीजी गॅस सिलिंडरच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत गॅस सिलिंडरचे एका मागून एक स्फोट झाल्याने संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. या भीषण आगीत, मुकेश कुमावत (३०) आणि मनजीत खान (२०) हे दोघेजण ६०% भाजले तर राकेश कडू (३०) आणि लक्ष्मण कुमावत (२४) हे दोघेजण ४०% भाजले असल्याने एकूण चार जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी, तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, याप्रकरणी चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, वर्सोवा, यारी रोड येथे एलपीजी गॅस सिलिंडरचे एक गोदाम आहे.या ठिकाणी गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात येतो. येथूनच घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात येतो. मात्र बुधवारी सकाळी ९.३५ वाजताच्या सुमारास यक गोदामात आग लागली. हळूहळू ही आग वाढत गेली. त्यांनतर या आगीचा कदाचित लिकेज सलेल्या गॅस सिलिंडरमधील गॅसशी संपर्क आल्याने आगीचा भडका उडाला. नंतर या आगीने भीषण रूप धारण केल्याने त्यामध्ये एका मागून एक गॅस सिलिंडरचे भीषण स्फोट घडत गेले. आगीची बातमी पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली.
सदर एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा केलेले गोदाम हे रहिवाशी परिसरात असल्याने नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या आगीत गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने आजूबाजूच्या बांधकामांना तडे गेले आहेत. सदर ठिकाणी सकाळी ९.३५ वाजताच्या सुमारास आग लागली. सकाळी १०.०२ वाजता ही आग स्तर १ ची झाली. नंतर आग भडकल्याने सकाळी १०.०६ वाजता आग स्तर -२ ची झाल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. अग्निशमन दलाने, ८ फायर इंजिन, ७ वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने ह्या आगीवर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळवून आग विझविली.

- Advertisement -

चौकशी व कारवाई करावी -: महापौर

सदर आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर व उप महापौर सुहास वाडकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच, कूपर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करीत त्यांच्यावर योग्य ते उपचार त्वरेने करण्याचे आदेश दिले. तसेच, निवासी भागात एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा करणे ही चुकीची बाब असल्याचे सांगत महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका व्यक्तीच्या फायद्यांसाठी अनेकांचा जीव धोक्यात घालणे ही गंभीर बाब असल्याचे महापौर म्हणाल्या. या घटनेची सर्वंकष चौकशी करण्यात येणार असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

महापौर कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन

आजच्या या घटनेवरून रहिवाशी विभागातील गॅस सिलिंडरचे साठे असलेले गोदामे व तेथील गॅस सिलिंडरचे साठे पालिकेच्या रडारवर आले आहेत. मुंबईत अशा प्रकारचा अवैध गॅस सिलिंडरचा साठा तसेच ज्वलनशील पदार्थांचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणांबाबत नागरिकांनी पुढे येऊन महापौर कार्यालयामध्ये तक्रारी द्याव्यात, असे आवाहन महापौरांनी केले आहे. तसेच, प्राप्त तक्रारीनुसार अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचा संबंधित विभाग यांना सोबत घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. आजच्या या घटनेबाबत सर्व यंत्रणांची आगामी दोन दिवसात बैठक घेण्यात येणार असून “प्रमाणित कार्यपद्धती” या बैठकीत निश्चित करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. आगीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या घरांचीसुद्धा महापौरांनी यावेळी पाहणी केली.तसेच, या दुर्घटनेत ज्या बांधकामांचे नुकसान झाले त्या नागरिकांना मोबदला देण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

- Advertisement -

सुदैवाने शाळा, रुग्णालय वाचले

यारी रोड मंगलनागर, येथे एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा तळमजला अधिक एकमजली गोदामात साठविण्यात आला होता. ज्या वेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी तेथील घरांना तडे गेले. तर गॅस सिलिंडरचे स्फ़ोट झाल्याने या सिलिंडरचे अवशेष आजूबाजूला उडाले. घटनास्थळापासून नजीकच अंजुमन शाळा असून सुदैवाने ही शाळा बंद असल्याने पुढील अनर्थ टळला. तसेच, नजीकच काळसेकर रुग्णालय असून त्याला काही हानी झाली नसल्याने सुटकेचा निःश्वास सोडण्यात आला.

गॅस सिलिंडर फुटून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पडला

ज्या ठिकाणी गॅस गोदामाला आग लागली व गॅस सिलिंडरचे स्फोट झाले, त्यापैकी एक सिलिंडर नजीकच्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन पडल्याचे माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.

निष्काळजीपणामुळे दुर्घटना

ज्या गोदामात ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी मोठ्या गॅस सिलिंडरमधून छोट्या गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरण्यात येतो. त्यावेळी काहीतरी निष्काळजीपणा झाल्याने सदर दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते, असे माजी नगरसेवक दिवे आंबेरकर यांनी सांगितले.


हेही वाचा- मुंबई-वर्सोवात सिलेंडरच्या गोदामाला आग; ४ जण जखमी

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -